Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

टोकावडे येथे शॉर्टसर्किटमुळे शेतघराला आग

 टोकावडे येथे शॉर्टसर्किटमुळे शेतघराला आग

 सुधाकर वाघ-मुरबाड



मुरबाड तालुक्यातील टोकावडे येथील एका शेतघराला विजेचे शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत संपूर्ण शेतघर जळून खाक झाले आहे . यामध्ये भात , शेतीसाठी लागणारे साहित्य , अवजारे , पेंढा इ . सामग्री जळून खाक झाली आहे . तालुक्यातील टोकावडे येथील शेतकरी हरेश धोंडू कोयते व सुभाष धोंडू कोयते यांचे गावात एक शेतघर आहे . यामध्ये शेतीसाठी लागणारी सर्व अवजारे , साहित्य , 120 भात कट्टे​ , दोन शेती पंप इंजीने , विहिरीतील गाळ काढणारी कॉरी , ट्यूटरचे चार टायर , पॉवर टिलरचे डिक्ससहीत दोन टायर , पिव्हिसी पाईप , दोनशे वासे , दोन हजार कौले , सागली दरवाजे व लाकडे इत्यादी ठेवली होती. बुधवारी(ता.21) रोजी सकाळी अकरा वाजताचे दरम्यान घरातील विजवाहक वायरिंग मध्ये शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली . 

घरात भाताचा पेंढा असल्याने आगीने रौद्ररूप धारण करून घरातील सर्व वस्तू अंदाजे चार ते पाच लाख रू.किमतीच्या जळून खाक झाल्या आहेत . याबाबत येथील समाजसेवक प्रकाश पवार यांनी तात्काळ तहसीलदार यांना माहिती देऊन व तलाठी बोलावून पंचनामा केला आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies