Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिवीर जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित

जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिवीर जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित

 आदित्य दळवी 

महाराष्ट्र मिरर कर्जत

शासन अधिसूचनेनुसार तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम, २०२० अन्वये जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोविड- १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तसेच जिल्हास्तरावर रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा स्तरावर रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

        कोविड-१९ या आजारावरील उपचारासाठी वापर होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात कमी असल्याने त्याचा काळाबाजार करून अवाजवी किंमतीत विक्री होत असल्याचे राज्यातील काही घटनांवरुन निदर्शनास आले आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेऊन रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करून विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध होण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत.       औषध नियंत्रण (भारत सरकार) यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपयोग For Treatment of suspected or laboratory confirmed Corona Virus desease २०१९ (Covid १९) in adult and children hospitalized with severe disease चे उपचार करण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्याचबरोबर Warning:- To be sold by retail on the prescription of specialist for use in hospital/institutional set up only हा इशारा देखील दिला आहे. तसेच Regulation मध्ये Empowered Officer च्या व्याख्येत आयुक्त, आरोग्य सेवा, संचालक, आरोग्य सेवा (DHS-I&II) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER), सर्व विभागीय आयुक्त (महसूल), सर्व जिल्हाधिकारी व सर्व महानगरपालिका आयुक्त यांचा समावेश केला असून त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

        या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी,रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिवीर जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यरत केला आहे. 

       याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे - नियंत्रण कक्ष क्रमांक :- 02141-222118 व टोल फ्री क्र.1077, औषध निरीक्षक श्री.किशोर राजणे- 8806947470, महसूल सहाय्यक श्री.प्रकाश करंबत- 8149692859, महसूल सहाय्यक श्री.प्रतिक बारीक- 9762200550

    

 


या नियुक्त कर्मचाऱ्यांनी औषध निरीक्षकांशी संपर्क व समन्वय ठेवून रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यामार्फत स्टॉकिस्ट यांना पुरविण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन साठ्याची माहिती संबंधित कंपनी व स्टॉकिस्ट यांनी नियंत्रण कक्षास कळविणे आवश्यक आहे. तशी माहिती त्यांच्याकडून घेऊन त्याबाबतची नोंदवही अद्यावत करणे, रेमडेसिवीर इंजेक्शनची स्टॉकिस्ट यांनी हॉस्पिटलच्या मागणीप्रमाणे इंजेक्शनच्या वितरणाबाबत केलेले नियोजन नियंत्रण कक्षास कळविणे आवश्यक आहे,अशी माहिती प्राप्त करून घेणे व हॉस्पिटलच्या मागणीप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा झाल्याबाबत खात्री करणे, सर्व कोविड-१९ रुग्णालय आस्थापना यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन स्टॉकिस्टकडून पुरवठा करण्यात आलेले इंजेक्शनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना द्यावयाचे आहेत, याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्यास कोविड रुग्णालय व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल,याबाबतच्या नोंदी अद्ययावत ठेवणे, सर्व कोविड-१९ रुग्णालय आस्थापना यांनी त्यांच्याकडील रुग्णांची अद्यावत माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गुगल स्प्रेडशिटवर अचूक भरावी. या रुग्णसंख्येनुसारच वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी संबंधित कंपनीच्या स्टॉकिस्टकडे करावयाची आहे, सर्व रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणारे स्टॉकिस्ट यांनी प्रत्येक दिवशी एकाच कंपनीचे रेमडेसिवीर इंजेक्शन संबंधित कोविड-१९ रुग्णालयास द्यावयाचे आहेत. एकाच रुग्णालयास मोठ्या प्रमाणात पुरवठा न करता सर्व रुग्णालयांची मागणी विचारात घेवून त्याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा. यामध्ये गैरप्रकार आढळल्यास संबंधित स्टॉकिस्ट व कोविड-१९ रुग्णालय व्यवस्थापन यांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, सर्व कोविड-१९ रुग्णालय व्यवस्थापकांनी रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत मागणीचे प्रिस्क्रीप्शन न देता मेडिकल प्रोटोकॉलनुसार स्वतः रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी स्टॉकिस्टकडे करावयाची आहे, अन्न व औषध प्रशासनाने कोविड- १९ रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे स्टॉकिस्टकडून पुरवठा सुरळीत होत असल्याबाबतची खात्री करावी, नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी व हॉस्पिटलनिहाय मागणी याबाबत नोंदी ठेवणे व तशी माहिती संकलित करणे व ही माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनास कळविणे, याबाबतची नोंदवही अद्यावत ठेवणे, नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत नेमणूक करण्यात आलेल्या भरारी पथकाकडून माहिती घेणे व ही माहिती रायगड अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे कळविणे, अशा प्रकारचे कामकाज व जबाबदारी या नियंत्रण कक्षाकडे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सोपविली आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies