"कोरोना रोखण्यासाठी ई-पॅाजवरील अंगठे बंद करा" नाहीतर १ मे पासून धान्य वाटप थांबविणार, जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

"कोरोना रोखण्यासाठी ई-पॅाजवरील अंगठे बंद करा" नाहीतर १ मे पासून धान्य वाटप थांबविणार, जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर.

 "कोरोना रोखण्यासाठी ई-पॅाजवरील अंगठे बंद करा"

नाहीतर १ मे पासून धान्य वाटप थांबविणार, जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर.

अमोल चांदोरकर - श्रीवर्धनकरोना संसर्ग रोखण्यासाठी ई पॅाज मशीनवरून लाभार्थ्यांचे अंगठे घेणे पुढील किमान दोन महिने बंद करावे, स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय कर्मचारी यांचा दर्जा द्यावा, तसेच ५० लाखाचे विमा कवच द्यावे. सरकारी कर्मचारी असलेले पोलिस कर्मचारी, डाॅक्टर, नर्स यांच्याप्रमाणेच रेशन दुकानदार देखील आपला जीव मुठीत घेऊन कुटुंबासाहीत दर महिन्याला वेळेवर संपूर्ण गावाला धान्य वाटप करत असतो. रेशन दुकानदार हा देखील करोना वाॅरीयर्सच आहे त्यामुळे यापुढे वरील मागण्या मान्य न केल्यास १ मे पासून धान्य वाटप बंद करण्याचा ईशारा स्वस्त धान्य  रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिल्याचे सांगितले आहे.

ॲानलाईन अंगठे घेतल्याने सरकारकडे सर्व डाटा वेळोवेळी जमा होतो हे खरे असले तरी सध्याचे करोनातील हे दिवस दिवसेंदिवस अडचणीचे होणारे आहेत. त्यात रेशन दुकानदाराला शासनाने नेहमीच हेतुपुरस्कर शासकीय सर्व योजनेतून दुर ठेवले आहे. ई-पॅाजवरून धान्य वाटपास आमचा विरोध नाही परंतु रेशन दुकानातून धान्य वाटप करताना एका लाभार्थ्यांचा कीमान चार ते पाच वेळा   अंगठा घ्यावा लागतो. एका दुकानातून दररोज कीमान २००-२५० लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जाते. सर्वांचे अंगठे घ्यावे लागत असल्याने करोना रोगाचा धोका अधिक वाढला आहे. गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत देखील लाभार्थांचे अंगठे घेण्याचे थांबविले होते. त्याच धर्तीवर स्वस्त धान्य दुकानदाराचा अंगठा व आधार कार्ड प्रमाण मानून धान्य वाटप देण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. करोना महामारीच्या काळात धान्य दुकानदारांनी कोणाचा भूकबळी जाऊ नये यासाठी जीवाची पर्वा न करता धान्य वाटप केले. तरीदेखील निवेदन देऊन देखील शासनाकडून दुकानदारांच्या मागण्यांची दखल घेता आली नाही. स्वस्त धान्य दुकानदारांना सरकारी कर्मचारी यांचा दर्जा द्यावा, किंवा जागतिक अन्न कार्यक्रमानुसार प्रति क्विंटल २७० रू कमिशन द्यावे, दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे, करोनामुळे मृत्यु झालेल्या दुकानदाराच्या वारसाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे किंवा राजस्थान राज्य सरकारच्या धर्तीवर पन्नास लाखांचा विमा काढून मिळावा,  प्रति क्विंटल एक ते दीड कीलो घट पकडावी, जुन्या मशीन बदलून ४जी कनेक्शन देण्यात यावे, हमालीच्या नावाखाली दुकानदाराची होणारी लूट थांबवावी या सर्व मागण्यांसह करोना महामारीमुळे मृत्युमुखी पडणार्यांचे प्रमाण वाढले आहे. मृतदेह जाळण्यासाठी नागरिकांकडून आमच्याकडे केरोसीनची मागणी केली जाते परंतु उज्वला गॅस योजनेतून रेशन दुकानदारांना मिळणारे रॅाकेल बंद केले आहे ते देखील चालू करण्याची मागणी रायगड जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment