Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आरोग्य व्यवस्थेने ऑक्सिजन,व्हेंटिलेटरची आवश्यक्ता तपासून उपचार केल्यास बेडस मिळण्यास सुलभता येईल - सचिन कदम

 आरोग्य व्यवस्थेने ऑक्सिजन,व्हेंटिलेटरची आवश्यक्ता तपासून उपचार केल्यास बेडस मिळण्यास सुलभता येईल - सचिन कदम

ओंकार रेळेकर-चिपळूण


आज कोरोनाच्या महामारीत बेडस मिळत नाहीत त्याबाबतीत जिल्हा व तालुका आरोग्य व्यवस्थेने जी सरकारी हॉस्पिटल तसेच ज्या कोविड सेंटर ना प्रशासनाने परवानगी दिली आहे त्याठिकाणी खरोखरच किती जणांना बेडसची आवश्यकता आहे,किती जणांना व्हेंटिलेटरची गरज आहे ते तपासणे गरजेचे आहे.त्यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे.गरज नसताना बेड अडल्यामुळे ज्यांना खरच गरज आहे त्यांची परवड होत आहे.यामुळे जे मृत्यूचे प्रमाण वाढतंय ते नियंत्रणात येण्यास मदत होईल.अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी केली आहे.आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असल्यामुळे त्यांनी पेशंटची चौकशी करून त्यांना खरच ऑक्सिजन बेडस,व्हेंटिलेटरची गरज आहे का हे बघावे.ज्यांना काही लक्षण नाहीत अशांना देखील ऍडमिट केल्याने ज्यांना खरच गरज आहे त्यांना बेड मिळेनासे झालेत.ज्यांना काही लक्षण नाहीत त्या नागरिकांना मागील वेळेस जस पेढांबेत विलगीकरण केलं होतं तशी किंवा तशा स्वरूपात अन्य ठिकाणी व्यवस्था करावी.

       कोविड रुग्णांच्या उपचारासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा

  चिपळूण नगरपालिकेने हॉटेल्स भाड्याने घ्यावीत,अपरांत सारखी हॉस्पिटल कोविड सेंटर उभारत आहेत त्यांना मदत करत आहेत ही चांगली बाब आहे.नगरपालिकेने अशा परिस्थितीत नक्कीच कोविड सेंटर साठी प्रयत्न करायला हवेत मात्र त्यांनी स्वतंत्र सेंटर उभारण्याचे प्रयत्न न करता अपरांत सारख्या हॉस्पिटल सोबत संयुक्तपणे सेन्टर उभारावे.त्यासाठी शासनाकडून उपलब्ध होणारे रेमडिसिव्हर,ऑक्सिजन या सुविधा उपलब्ध करून दयाव्यात. सोबत यासेंटरसाठी लागणारी यंत्रणा जे नगरपालिकेकडे ४० लाख शिल्लक आहेत त्यातून उभारावी.त्यासाठी कुठल्याही कौन्सिलची आवश्यकता नाहीतर ५८/२ चा वापर करावा.

       तरुणांनी कोविडपासून बचाव करून अधिक प्रमाणात लसीकरण करावे

सध्या तरुणांमध्ये हा आजार फैलावत असल्याने विशेषतः तरुणांनी काळजी घ्यावी.त्यांच्यामुळे संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होत असल्याची प्रकरण पुढं येत आहेत.यासाठी तरुणांनी स्वच्छता , मास्क, सॅनिटायझर वापर जे शासनाने नियम घालून दिलेत त्याचे पालन करावे.ज्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.राज्याला लवकर जर कोरोना मुक्त करायचे असेल तर तरुणांसह सर्व नागरिकांनी जशी लस उपलब्ध होईल तसे लसीकरण करून घ्यावे.

  कोविडमुळे निराधार कुटुंबांना शिवसेना देणार आधार 

          कोरोनामुळे ज्या कुटुंबानी कमावते पुरुष, तरुण गमावलेत त्या कुटुंबाना शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम व शिवसेना आर्थिक आधार देताना सामाजिक बांधिलकी जपणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies