भाजप हा सर्व सामान्य जनतेसोबत आहे.लॉकडाऊन हा पर्याय नाही, -जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते
अमूलकुमार जैन-अलिबाग
सततच्या लॉकडाऊनमुळे आज व्यापारी व जनता त्रस्त आहे. मिनी लॉकडाऊन सांगून प्रत्यक्षात सर्वच दुकाने बंद करणे, ही महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका आम्हाला कदापी मान्य नाही. भाजप हा सर्व सामान्य जनतेसोबत आहे.लोकडावून हा पर्याय नाही, असे प्रतिपादन रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी मुरुड येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले
यावेळी महेश मोहिते यांनी सांगितले की केवळ विकेंडला लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध लावले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात संपूर्ण लॉकडाऊन करुन या महाविकास आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप या वेळी अॅड. यांनी केला.
अलिबाग व मुरुडमध्ये सर्व दुकाने बंद करण्यास मोठा विरोध झाला आहे. लोकांना रोजगार नाही तर दुकाने नुकतीच सुरू झालेली असताना ती बंद करण्याचा निर्णय घेणे हे साफ चुकीचे आहे. चेंबर ऑफ कॉमर्सनेसुद्धा याला विरोध केला असून लवकरच ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. व्यापार्यांनी दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सहकार्य करणार व वेळ पडल्यास आंदोलन करणार असे मोहिते यांनी सांगितले