रायगड राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक 2 ची उल्लेखनीय कामगिरी - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, April 9, 2021

रायगड राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक 2 ची उल्लेखनीय कामगिरी

रायगड राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक 2 ची उल्लेखनीय कामगिरी

अवैध गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्यसाठा व कार जप्त

महाराष्ट्र मिरर वृत्तसेवा-अलिबागनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2. पनवेल यांना माहिती मिळाल्यानंतर त्या पथकांनी दि.07 एप्रिल रोजी पनवेल तालुक्यातील मौजे निलकंठ स्वीट समोर, सेक्टर 20, खारघर, येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या वाहतुकीवर पाळत ठेवून छापा घातला. 

    या छाप्यात  एम.एच.46 ए.एल 4453 या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इरटिगा कंपनीच्या कारमधून गोवा निर्मित विदेशी मद्याच्या 36x750 मिलिलीटर क्षमतेच्या, 12 हजार 375 मिलिलीटर क्षमतेच्या, 1 लाख 94 हजार 180 मिलिलीटर क्षमतेच्या 45 लाख 64 हजार 500 मिलिलीटर क्षमतेचे स्ट्रॉग बिअरचे सीलबंद कॅन व एक ॲपल कंपनीचा 45 आयफोन मोबाईल सिमकार्ड सहीत 1) मुलावरअली रोजनअली शेख, वय 46 वर्षे रा. रुम नं.1001, केसेंट हायलाईट, सेक्टर 35 डी, प्लॉट नंबर 4, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड. 2) वाजिद नूर सय्यद, वय 24 वर्षे रा. बिरोबा रोड, कालिकानगर, डॉ. वपे हॉस्पिटल, मु/ पो. शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर, 3) साईनाथ श्रीमंत पटाले, वय 29 वर्षे रा. बिरोबा रोड, कालिका नगर, डॉ. वपे हॉस्पिटल, मु./पो. शिर्डी, ता.राहता, जि. अहमदनगर. या तिन्ही आरोपीस अटक करुन त्यांच्याकडून रुपये 5 लाख 87  हजार 830/-रुपये किंमतीचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला.

      ही कारवाई राज्याचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री. कांतीलाल उमाप, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) श्रीमती उषा राजेंद्र वर्मा, कोकण विभाग ठाणे विभागीय उपायुक्त श्री. सुनिल चव्हाण, रायगड-अलिबाग अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, उपअधीक्षक श्री. विश्वजीत देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथक ठाणेचे निरीक्षक श्री. आनंदा कांबळे, निरीक्षक श्री. एस. एस. गोगावले, निरीक्षक श्री. अविनाश रणपिसे, दुय्यम निरीक्षक श्री. एस. एस. गायकवाड,  दुय्यम निरीक्षक श्री. ए. सी. मानकर तसेच श्री. पालवे, जवान नि-वाहनचालक श्री. संदीप पाटील, श्री. हाके, जवान श्री. डी. डी. पोटे, श्री. एस. ए. मोरे तसेच विभागीय भरारी पथक ठाणे यांचा स्टाफ जवान श्री. आजगावकर, श्री. अविनाश जाधव, श्री. दिपक घावटे, श्री. गिते व जवान-नि-वाहनचालक श्री. सदानंद जाधव यांनी पूर्ण केली.  तसेच या कारवाईत श्री. मनोज अनंत भोईर व श्री. अनंत दत्तू जगदाडे यांनी सहकार्य केले.

      या गुन्हयाचा पुढील तपास अधीक्षक श्रीमती. किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड हे करीत आहेत.


No comments:

Post a Comment