आदिती तटकरे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे ड्यूरा ऑक्सिजन सिलेंडर सिस्टीमचे उद्घाटन
अमोल चांदोरकर -श्रीवर्धन
तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शासनाच्यावतीने ड्यूरा सिलेंडर उपलब्ध करून घेतले असून त्यांच्याच हस्ते या सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर ढवळे , उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पांडे गटविकास अधिकारी ,सां .बा ,कार्यकारी अभियंता गणगणे, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. ड्यूरा ऑक्सिजन सिलिंडरमुळे ऑक्सिजन साठा वाढला असून या आधी रुग्णालयात पालकमंत्री ना. आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी सेंट्रलाइज्ड ऑक्सिजन सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. आजमितीला रुग्णालयात 6 ड्यूरा ऑक्सिजन सिलेंडर 20 जम्बो सिलेंडर 18 स्मॉल सिलेंडर आहेत ,
एका ड्यूरा सिलेंडर मध्ये साधारणपणे 10 जम्बो सिलेंडरच्या प्रमाणात ऑक्सिजन साठा राहतो. उद्घाटनानंतर अदितीताईनी कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस करून त्यांना धीर दिला .रुग्णालयात लवकरच पी एच सी सिस्टीम कार्यान्वित करण्याबाबत पालकमंत्र्यांनी यावेळी सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. पी एच सी सिस्टीम मुळे जागेवरच ऑक्सिजन तयार होईल. कोरोनाबाधित रुग्णांना तसेच अत्यावस्त रुग्णांना याचा फायदा होणार असल्याने जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपजिल्हा रुग्णालयातून पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी नगरपालिका कार्यालयात जाऊन आढावा घेतला त्यानंतर आराठी येथे तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटर ची देखील प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला .