भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यव्यापी covid सहाय्यता हेल्पलाइन कार्यरत. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, April 23, 2021

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यव्यापी covid सहाय्यता हेल्पलाइन कार्यरत.

 भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यव्यापी covid सहाय्यता हेल्पलाइन कार्यरत.

राम जळकोटे-उस्मानाबादराज्यभरात कोरोनाच्या संकट काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्वच कार्यकर्ते दिवस-रात्र सेवाकार्य करून नागरिकांना मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही सर्व युवा कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून सेवाकार्य करत होते व सध्याही प्रत्येक जिल्ह्यात सर्वच कार्यकर्ते नागरिकांना यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सेवाकार्य अधिक प्रभावीपणे करता यावे व जास्तीत जास्त नागरिकांना या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत दादा पाटील,राष्ट्रीय भाजयुमो अध्यक्ष खा तेजस्वी सूर्या,प्रदेश प्रभारी चंद्रशेखर  बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ०२०६७३२६०९० या राज्यव्यापी हेल्पलाइन चा शुभारंभ करण्यात आला आहे.या हेल्पलाईन च्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक सेवा, हॉस्पिटल तसेच औषधे या विषयाची समस्या, प्लाजमा आवश्यकता व डोनेशन,वाढीव नियमबाह्य बिले,अडकून पडलेल्या नागरिकांना मदत, ज्येष्ठ नागरिक माता-भगिनींना घराबाहेर पडता येत नसल्यास त्यांना सहाय्य अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्याचा प्रयत्न येणार आहे अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  विक्रांत पाटील यांनी दिली; तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,आपण अडचणीच्या काळात या हेल्पलाइनचा अवश्य उपयोग करावा,तसेच #BJYMCares या सह ट्विटर वर समस्या कळवावी , आमचे राज्यभरातील कार्यकर्ते आपणास मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील.

राज्य सरकार त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यात सपशेल अपयशी होत असल्याने आता सामान्य जनतेच्या अपेक्षा केवळ भाजपा परिवाराकडूनच आहेत प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर व आमदार राणा जगजितसिंह पाटील ,जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्या मध्ये आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अधिक जबाबदारीने काम करत असुन नागरिकांना सेवा कार्यातून अधिक दिलासा देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी धाराशिव युवा मोर्चा कटीबद्ध आहे तसेच 27 एप्रिल या दिवशी प्लाजमा डोनेट कॅम्प चा आयोजन धाराशिव येथे केले आहे इच्छुक दात्यांनी संपर्क करावा असे आवाहन भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले आहे .

No comments:

Post a Comment