Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

'महापौरांनी घेतली सर्वपक्षीय गटनेत्यांसमवेत कोरोना आढावा बैठक'

 'महापौरांनी घेतली सर्वपक्षीय गटनेत्यांसमवेत कोरोना आढावा बैठक'

अमोल धोत्रे - पुणे



शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व  पक्षनेते, पदाधिकारी व महापालिका अधिकारी व आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये कोरोना आढावा बैठक महापौर निवासस्थान येथे पार पडली. कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना, कोरोना रुग्णांकरता मोठ्या प्रमाणावर बेड्सचे व्यवस्थापन, ऑक्सिजन ची शहरातील स्तिथी, रेमडेसिवीर इंजेक्शन चा तुटवडा, व्यापक लसीकरण मोहीम तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासकीय समन्वय या बाबतीत सर्वांनी आपापली मते मांडून सविस्तर चर्चा करण्यात आली.



नाशिक येथे झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने तशा प्रकारची अनुचित घटना पुणे शहरात होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या दृष्टीने व्यापक चर्चा झाली असून, शहरातील सर्वच रुग्णालये जिथे ऑक्सिजन यंत्रणा उपलब्ध असेल त्या ठिकाणचे फायर ऑडिट प्रमाणेच ऑडिट करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्या पद्धतीच्या सूचना देखील संबंधित रुग्णालय प्रशासनास करण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाच्या अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून पुणे शहरातील रेमडेसिवीरची तूट भरून काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना व मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे.



याप्रसंगी उपमहापौर सुनिताताई वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, अति.आयुक्त रुबल अग्रवाल, अति. आयुक्त कुणाल खेमनार, विरोधीपक्ष नेत्या दिपालीताई धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेस गटनेते आबा बागुल व इतर मान्यवत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies