Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोयना धरण परिसरात 3 रिश्टर स्केल चे 2 भूकंप,स्थनिक नागरिकांच्यात भीतीचे वातावरण

 कोयना धरण परिसरात 3  रिश्टर स्केल चे 2 भूकंप,स्थनिक नागरिकांच्यात भीतीचे वातावरण

         प्रतीक मिसाळ- सातारा

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात आज ( शनिवारी ) दुपारी दोनच्या सुमारास भूकंपाचे 2 धक्के जाणवले . यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते . या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरातील गावांनाही बसले आहेत . हे भुकंपाचे हादरे 3 रिश्टर स्केलचे असल्याचे समजत आहे .कोयना धरण क्षेत्रात आज शनिवारी दुपारी 1:55 मिनिटांनी पहिला भूकंप 2.9 रिश्टर स्केल इतका होता , तर दुसरा भुकंप 1:57 मिनिटांनी 3.00 रिश्टर स्केल होता . या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यातील जावळे गावच्या वायव्येला आठ किलोमीटरअंतरावर होता . त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते . याबाबतची माहिती कार्यकारी अभियंता , कोयना सिंचन विभाग यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies