भारती हॉस्पिटल ऑक्सीजन निर्मिती प्लँट करणार उभा : डॉ. विश्वजीत कदम
सुधीर पाटील-सांगली
येत्या 30 ते 40 दिवसात सांगली मिरज रोड वरील भारती हॉस्पिटल येथे साडेचार कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन निर्मितीचा प्लँट उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मंत्री कदम म्हणाले ह्या प्लँट मधून मिनिटाला 400 लिटर ऑक्सिजन तयार केला जाणार आहे. असे तीन प्लँट या ठिकाणी उभे केले जाणार आहेत. या तीन प्लँटमुळे भारती हॉस्पिटलला ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ऑक्सिजनसाठी इतर कोणत्याही ठिकाणाहून मागणी करावी लागणार नाही. तसेच या ठिकाणी जो अतिरिक्त ऑक्सिजन तयार होणार आहे. तो जिल्ह्यातील इतर रुग्णालयांना पुरविण्यात येणार आहे. या प्लँटच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली आहे, त्यामुळे हा प्लँट लवकरच कार्यान्वित होणार आहे. यावेळी भारती चे प्रमुख हणमंतराव कदम, डीन डॉ देशमुख, उपस्थित होते