पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते म्हसळा ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेडचे उदघाटन
- स्वतंत्र वार्डसह 12 ऑक्सिजन बेड महिलांसाठी राखीव.
अरुण जंगम-म्हसळा
कोरोना प्रादुर्भावावर मात करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत व सहकार्य करीत असतानाच रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग घेत नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहेत.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हसळा तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली आणि आरोग्य सेवा मिळणेसाठी एकच धावपळ उडाली त्यातच अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासु लागली.पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शासन स्तरावर जलदगतीने म्हसळा ग्रामीण रुग्णालयासाठी 30 ऑक्सिजन बेडची मंजुरी मिळवून दिली त्याचे उदघाटन दिनांक 31 मे रोजी त्यांच्याच शुभ हस्ते करण्यात आले.उपलब्ध 30 बेड पैकी 12 ऑक्सिजन बेड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी माहिती देताना सांगितले.म्हसळा ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड -19 डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी महिन्याभरापूर्वी जाहीर केली होती आणि अवघ्या 15 दिवसांत ऑक्सिजन बेड सह सर्व त्या सोयींनीशी मुबलक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल म्हसळा वाशिय नागरिक समाधान व्यक्त करून ना.आदिती तटकरे यांना धन्यवाद देत आहेत.दवाखान्यात सुरवातीला दोन मोबाईल ऑक्सिजन व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याच बरोबर रुग्णालयात बाधीत रुग्णांसाठी अधिक बेडची उपलब्धता करण्यात येणार आहे.दवाखान्यात 4 ऑक्सिजन कॉन्स्स्ट्रेटर उपलब्ध आसुन अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.पावसाळ्यात विज खंडित होण्याची शक्यता असते तो प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 16 kv चे जनरेटर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.रुग्ण सेवे साठी सर्वोतोपरी आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. दिनांक 29-5-2021 रोजी पालकमंत्री म्हसळा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या असता प्रथम त्यांनी म्हसळा तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी येथे उपस्थित राहून रायगड जिल्हा परिषद व स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिरते लसीकरण व्हॅनचे उदघाटन केले होते त्याच बरोबर म्हसळा ग्रामिण रुग्णालय आणि खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिलेल्या "102 जननी सुरक्षा अंतर्गत रुग्णवाहिका त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्या त्याच वेळी ना.आदिती तटकरे यांनी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांत ऑक्सिजन बेड कार्यान्वित करणार असल्याचे सांगितले होते त्या नुसार ते कृतीत आणले आहे.
ऑक्सिजन बेडच्या उदघाटन कार्यक्रमाला पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत प्रांताधिकारी अमित शेडगे,तहसीलदार शरद गोसावी, पक्षाचे जेष्ठ नेते अलीशेट कौचाली,तालुका अध्यक्ष समीर बनकर,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,माजी सभापती उज्वला सावंत,माजी सभापती नाझीम हसवारे,नायब तहसिलदार के.टी.भिंगारे,गट विकास अधिकारी वाय.एम.प्रभे,मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,पी.आय.उद्धव सुर्वे,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.मधुकर ढवळे,आरोग्य अधिकारी डॉ.महेश मेहता,प्र.टी.एच.ओ.डॉ.प्रशांत गायकवाड,डॉ.अलंकार करंबे,मा.नगराध्यक्षा जयश्री कापरे,उपनगराध्यक्ष सुहेब हलदे,गट नेते संजय कर्णिक,सार्वजनिक बांधकाम अभियंता गणगणे,पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे,शाहिदभाई उकये,तालुका महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,गण अध्यक्ष सतीश शिगवण,अनिल बसवत,संतोष नाना सावंत,किरण पालांडे,भाई बोरकर,प्रकाश गाणेकर,दामोदर पांडव आदी मान्यवर कार्यकर्ते,शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.