महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, May 1, 2021

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

 महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

 अमूलकुमार जैन-अलिबागमहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

        या ध्वजारोहण समारंभाला अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी  निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार सचिन शेजाळ, तहसिलदार सतिश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील मोजकेच कर्मचारी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत उपस्थित होते.

      या निमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या रायगडवासियांना शुभेच्छा दिल्या व  करोनाच्या संकटातून आपण सर्वजण एकजुटीने बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला.

       करोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे व करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला हा ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व करोना प्रतिबंधक नियमांचे काटकोरपणे पालन करीत संपन्न झाला. 


No comments:

Post a Comment