पुण्यात हडपसर भागात अमली पदार्थ तस्करी घुमरे गजाआड; पाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, April 30, 2021

पुण्यात हडपसर भागात अमली पदार्थ तस्करी घुमरे गजाआड; पाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त

 पुण्यात हडपसर भागात अमली पदार्थ तस्करी 

  घुमरे गजाआड; पाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त

किशोर उकरंडे -पुणेअंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रामटेकडी हडपसर परिसरात सापळा रचून जेरबंद केले. महादेव घुमरे (वय.38,रा.रामनगर, रामटेकडी) असे अटक केलेल्याचे तस्कराचे नाव आहे. यावेळी त्याच्या कडून 5 लाख 3 हजार रुपये किंमतीचे 71 ग्रॅम 990 मिलीग्रॅम ब्राउनशुगर व दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा पाच लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी घुमरेविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक गुरूवारी दुपारी रामटेकडी परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना घुमरे एसआरपीएफ ग्रुपकडे जाणाऱ्या रोडने थॉमस गॅरेज समोरील रोडवर अंमली पदार्थ घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली होती.

No comments:

Post a Comment