नांदगावच्या समुद्रकिनारी मानवी सांगाडे सापडल्याने खळबळ - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

नांदगावच्या समुद्रकिनारी मानवी सांगाडे सापडल्याने खळबळ

 नांदगावच्या समुद्रकिनारी मानवी सांगाडे सापडल्याने खळबळ.

अमूलकुमार जैन-अलिबाग

मुरुड तालुक्यातील नांदगावच्या गणपती मंदिरानजिकच्या स्मशानभूमी शेजारील समुद्र किनारी मानवी सांगाडे सापडल्याने मोठी खळबळ माजली .


        समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटांनी किनार्याची धूप झाली असून या परिसरातील वाळू तस्करांनी देखिल वाळू उत्खनन करण्यासाठी किनार्यावर खड्डे खोदल्याने तेथिल वाळूच्या टेकड्या ढासळत असून तेथे अनेक वर्षापूर्वी गाडले गेलेले काही मानवी मृतदेहाचे  सांगाडे सापडले आणि एकच खळबळ उडाली.


     दरम्यान मुरुड पोलिस ठाण्याला या घटनेची खबर कळताच पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. अलिबाग येथिल रायगड जिल्ह्याच्या उप अधिक्षकांनीही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता सदर सांगाडे हे सुमारे पन्नास साठ वर्षापूर्वी अथवा त्याहून अधिकच्या काळात समुद्रकिनारी मृतदेह दफन केले जात असत त्या काळी या ठिकाणी वाळूच्या टेकड्याही होत्या.परंतु सध्याच्या काळात येथिल नागरिकांनी त्यांचे सपाटीकरण करुन बागायती बनविल्या आहेत. तसेच या भागातील खाड्यांच्या परिसरातही विकासाच्या नावाखाली अनिर्बंध मातीचे भराव टाकले गेल्यामुळे उधाणाच्या भरतीच्या व पावसाळी उधाणामुळे पाणी किनार्यावर धडका मारायला लागले परिणामी येथिल किनार्याची धूप होऊ लागल्याने अनेक वर्षापूर्वीच्या मृतदेहांचे कुजलेले सांगाडे आता बाहेर येत आहेत.सदर सांगाड्यातील हाडे पुर्णपणे ठिसूळ झाली असून हात लावताच काहींचा भुगा होत आहे.


      सदर मानवी सांगाड्यातील हाडे पुन्हा खड्डे खोदून गाडून टाकण्यात आले आहेत.सांगाडे सापडलेली जागा ही नांदगाव ग्रामपंचायतीची असून तिच्या शेजारीच नांदगावची स्मशानभूमी आहे.विशेष म्हणजे या परिसरात काही वर्षापूर्वी धार्मीक स्थळांच्या विकासासाठी शासनाने केलेल्या मदतीतून येथे करण्यात आलेले संडास बाथरुमची शेडही उन्मळून पडली आहे तसेच आजुबाजुच्या नारळ सुपारीच्या बागाही उद्धवस्त झाल्या आहेत.


-

No comments:

Post a Comment