सावळे येथील इसमावर जीवघेणा हल्ला, ठासणीच्या बंदुकीने केला गोळीबा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, May 9, 2021

सावळे येथील इसमावर जीवघेणा हल्ला, ठासणीच्या बंदुकीने केला गोळीबा

 सावळे येथील इसमावर जीवघेणा हल्ला,

ठासणीच्या बंदुकीने केला गोळीबार 

नरेश कोळंबे-कर्जत 

    


        कर्जत तालुक्यातील सावळे येथे राहणारे जनार्दन सदाशिव धुळे यांच्या वर काल दि.9 रोजी गोळीबार करत हल्ला झाला . ठासणीच्या बंदुकीने गोळ्या झाडण्यात आल्याने जखमी फिर्यादी यांना एम जी एम हॉस्पिटल येथे तात्काळ हलविण्यात आले आहे.

       कर्जत तालुक्यातील जनार्दन सदाशिव (सदु) धुळे हे मंगळवार आणि रविवार नित्यनेमाने  कोठिंबे पासून पुढे असणाऱ्या  खांबलिंग या मंदिरात दर्शनासाठी जात असत.  काल दिनांक  9 रोजी रविवार असल्याने फिर्यादी  मंदिरात जाऊन दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्यावर साडे अकरा ते बाराच्या सुमारास पाठीवर ठासणीच्या बंदूकीतून गोळ्या झाडण्यात आल्या. सदर बंदुकीच्या गोळीतून 9 छर्रे  शरीराच्या हात, मांडी, पोट,  अशा भागात घुसल्याने सदर फिर्यादी जखमी झाला. मित्राशी संपर्क साधल्यानंतर त्याला लगेचच एमजीएम हॉस्पिटल येथे  पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले . शस्त्रक्रिये नंतर  शरीरातील तीन छर्रे  काढण्यात  डॉक्टरांना यश आले असून राहिलेले  छर्रे लवकरच  काढण्यात येतील, असे जखमी इसमाच्या नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान आरोपी हा कोठिंबे येथे राहणारा  इसम असल्याचे समजते त्याने असं कोणाच्या सांगण्यावरून केलं?  की त्याची काही दुश्मनी होती ?  या सर्व गोष्टींचा तपास कर्जत पोलिस ठाण्याचे पो. आ.सो व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण भोर करत असून सदर गोष्टीचा छडा लवकरच लावण्यात येईल , असे त्यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment