Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

स्मिता गायकवाड यांची हडपसर भागात गरजू नागरीकांना मदत

 स्मिता गायकवाड यांची हडपसर भागात गरजू नागरीकांना मदत

गजानन गायकवाड -पुणे 19 मे 2021 रोजी स्मितसेवा फौंडेशन, महाएनजीओ फेडेरेशन व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर यांच्या  वतीने परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त एक महिना पुरेल अशा 40 किराणा किटचे वाटप करण्यात आले.  या covid 19 मध्ये लोकांना नोकरी नाही, सर्व उद्योगधंदे बंद आहेत आणि कोरोना हा घराघरात पसरल्यामुळे बऱ्याच लोकांचे दवाखाना आणि औषधांना आतापर्यंत साठवलेली त्यांची जमापुंजी खर्च झाली आहे. अतिशय बिकट स्थिती मध्ये लोक रहात आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्मितसेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ स्मिताताई तुषार गायकवाड व D3 केंअरिंग सोशल क्लब चे स्वप्निल पाटील यांच्या या सहकार्याने हडपसर ससाणे नगर भागातील गरजू कुटुंबांना किराणा किट चे वाटप करण्यात आले. यावेळी राजेश कांबळे,  संजय शिंदे,  संगीता पाटील, सौ नूतन पासलकर, डॉ. श्रुती वरपे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies