सातारा पालिकेकडून सातरकरांची तीन महिन्याची घरपट्टी माफ;तब्बल 71 लाखाची कर माफी.
६६९७ मिळकत धारकांना होणार फायदा
प्रतीक मिसाळ-सातारा
सातारा : सातारा पालिकेने 2020-21 या आर्थिक वर्षात 6697 बिगर निवासी मिळकतीना तीन महिन्याची मालमत्ता कर माफी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे . या द्वारे 71 लाख 57 हजार 13 रुपयांची सूट दिली जाणार आहे याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे . पत्रकात नमूद आहे की 3 फेबुवारी 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या ठराव क्रं 41 नुसार सातारा शहरातील 6697 मिळकतींना तीन महिन्याच्या मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय झाला होता . ती 71 लाख 57 हजार 13 रूपयांची रक्कम सूट म्हणून बिलातून वगळली जाणार आहे . तीन महिन्याच्या मिळकत कराला देऊन करोनाच्या काळात साताऱ्याच्या व्यावसायिक बांधवाना दिलासा देण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे .
असा निर्णय घेणारी सातारा नगरपालिका ही पहिली पालिका असल्याचे सांगून उदयनराजे पुढे म्हणतात कोणतीही पालिका शहराची प्रमुख मातृसंस्था असते . नागरिकांची कामे सहज व पारदर्शीपणे होण्यासाठी सातारा विकास आघाडी सातत्याने आग्रही राहिली आहे . पंधरा वर्षापूर्वी सातारा पालिकेत 782 कर्मचारी वर्ग होता ती संख्या आता 455 वर येऊन ठेपली आहे . शहराची लोकसंख्या सुध्दा दुप्पट वाढली आहे . राज्य संवर्गातून सुद्धा पालिकेला जे 25 कर्मचारी मिळाले आहेत ते सुध्दा अत्यंत जवाबदारीने काम करत आहेत . नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून सातारा शहरासाठी जास्तीत जास्त
केंद्र व राज्य सरकारकडून सातारा शहरासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न आहे . गेल्या चौदा महिन्यापासून सुरू असलेल्या करोना महामारीने छोटे मोठे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत . त्यांची अडचण लक्षात घेऊन निवासी व बिगर निवासी मिळकत धारकांच्या घरपट्टी माफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे . त्या प्रस्तावावर तात होणे अपेक्षित आहे . मात्र तेवढ्यावरच न थांबता सातारा पालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात 6697 मिळकतींना तीन महिन्याच्या मालमत्ता करात 71 लाख 57 हजार 13 रूपयांची सवलत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे . केंद्राकडून अतिरिक्त निधी मिळवणे व शासकीय बचत या दोन प्रमुख स्त्रोताद्वारे ही तूट भरून काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे प्रसिध्दी पत्रकात शेवटी उदयनराजे यांनी स्पष्ट केले आहे .