शिराळा तालुक्यात गारपीटीने फळभाज्या पिकांचे नुकसान, घरांची पडझड. - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, May 2, 2021

शिराळा तालुक्यात गारपीटीने फळभाज्या पिकांचे नुकसान, घरांची पडझड.

 शिराळा तालुक्यात गारपीटीने  फळभाज्या पिकांचे नुकसान, घरांची पडझड.

उमेश पाटील -सांगली


शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या गारपिटीच्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. फळभाज्या  पिकाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे . पांचुंब्री येथील शेतकरी विकास माने यांच्या वांग्याच्या बागेतील संपूर्ण फुलकळीची झड झाली आहे. तर कापरी मध्ये दुसऱ्या दिवशी झालेल्या गारपिटीमुळे  पीकांसह घरांची पडझड झाली आहे.


शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वाळवाचा  पाऊस पडत आहे. वादळ,वारा आणि  गारा यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पांचुंब्री येथील शेतकरी विकास आनंदा माने यांची    38 गुंठ्यांतील वांग्याच्या बागेत   पुर्णपणे फुलकळी ची झडली आहे. तसेच फुटवा,  पाने गारपिटीने झडली आहेत. त्यांनी त्रिशूळ या जातीची वांग्याची मार्च महिन्यात लागवड केली आहे. आतापर्यंत पर्यंत त्यांचा बाग व्यवस्थापणासाठी  ५० हजार रूपये खर्च झाला आहे.या बागेतून त्यांना अपेक्षित उत्पन्न तीन लाख रुपये होते.पण गारपीटीमुळे संपुर्ण फुलगळ झाल्याने, यावर पाणी फिरले आहे. 

कापरी ता.शिराळा येथे सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे, गारा आणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला .त्यामध्ये घरे,जनावराची शेड व शेतीचे मोठे नुकसान झाले.  दुपारनंतर वातावरण गरम होत गेले व सायंकाळी साडेपाच वाजता ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे व मोठमोठ्या गारांसह पाऊस चालू झाला. सुमारे एक तास हा पाऊस चालू होता.

या अवकाळी पावसाने  गवताच्या व पिंजराच्या गंज्या भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले. पहिल्या पावसातुन राहिलेला भाजीपाला, आंबा जमीनदोस्त झाला आहे.गारांमुळे ऊसांची  पाने फाटली आहेत.घरांवरील कौले ऊडाली आहेत .तर अनेक ठिकाणी शेडची पत्र्याची पाने ऊचकटुन पडली आहेत.गावातील  व शेतातील विद्युत तारा तुटुन वीजपुरवठा खंडित झाला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत . ते करून नुकसान ग्रस्तांना मदत मिळावी. अशी मागणी शेतकरी करत आहेत.
No comments:

Post a Comment