डीवायएसपी सचिन बारींनी चिपळूण व्यापाऱ्यांना दिली ११ नंतर बंदची सक्त ताकीद - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 5, 2021

डीवायएसपी सचिन बारींनी चिपळूण व्यापाऱ्यांना दिली ११ नंतर बंदची सक्त ताकीद

 डीवायएसपी सचिन बारींनी चिपळूण व्यापाऱ्यांना दिली ११ नंतर बंदची सक्त ताकीद

 ओंकार रेळेकर-चिपळूण

बाजारपेठेत वाढणारी गर्दी लक्षात घेता डीवायएसपी सचिन बारी यांनी आज गुरुवार दिनांक ६ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून बाजारपेठेत पायी चालून पाहणी केली. 

यावेळी अत्यावश्यक सेवेत नेसलेली अनेक दुकाने उघडी दिसली अशा दुकानदारांना शेवटची सूचना देण्यात आली. अत्यावश्यक सेवा ११ पर्यंत आणि इतर दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याच्या सक्त सुचनां यावेळी करण्यात आल्या. 

डीवायएसपी सचिन बारी आणि नगर परिषदचे पथक सकाळीच कारवाई करताना पाहून अनेकांची धावपळ झाली. या पथकाने चिपळूण बाजारपेठ आणि गोवळकोट रोड येथील दुकानांची ही पाहणी करून कडक सूचना दिल्या.       चिपळूण परिसरात कोविड चे रुग्ण झपाट्याने वाढतायत. बेड अभावी अनेक रुग्ण दगवतायत अशा परिस्थितीत काही व्यापारी नियम पाळत आहेत तर काही नियम भंग करत आहेत.

कोविड संसर्ग टाळायचा असेल तर शासनाने दिलेले नियम पाळावेच लागतील अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment