एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सिद्धांत उत्तम कोळेकरचे यश प्रेरणादायी : अॅड. अमोल भोजने
इंडियन सायंटिफिक सोसायटीतर्फे कोरोना कालावधीनंतर भव्य सत्काराचे आयोजन
ओंकार रेळेकर-चिपळूण
अॅड अमोल भोजनेंचे घाटकोपर येथील मित्र सिद्धांत उत्तम कोळेकर याने एमबीबीएस परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण यश मिळवून डॉक्टर पदवी संपादन केली आहे.त्यांचे यश आजच्या तरुणांना प्रेरणादायी असेच आहे असे भोजने यांनी शुभेच्छा देताना सांगितले.
शालेय शिक्षणात प्रथम पासूनच हुशार विद्यार्थी असणाऱ्या सिद्धांत याने सायन हॉस्पिटल येथील वैद्यकीय महाविद्यालयातून ६५ टक्के गुण मिळवून ही पदवी प्राप्त केली आहे.विशेष म्हणजे त्याने सीईटी परीक्षेत २०० पैकी १८५ गुण संपादन करून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली होती.
एमबीबीएस परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सिद्धांत उत्तम कोळेकरचा इंडियन सायंटिफिक सोसायटीतर्फे कोरोना कालावधीनंतर भव्य सत्कार करणार असल्याचे देखील भोजने यांनी सांगितले.ज्यामुळे येथील तरुणांना प्रेरणा मिळेल असे त्यांनी शुभेच्छा देताना सांगितले.
त्याच्या या भरघोस यशाबद्दल नातेवाईक,आतेष्ट तसेच मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.