गोवा बनावटी मद्याची तस्करी करणाऱ्यावर भुदरगड पोलिसांची कारवाई ; साडेतीन लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त.. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, May 7, 2021

गोवा बनावटी मद्याची तस्करी करणाऱ्यावर भुदरगड पोलिसांची कारवाई ; साडेतीन लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त..

 गोवा बनावटी मद्याची तस्करी करणाऱ्यावर भुदरगड पोलिसांची कारवाई ; साडेतीन लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त..

भिमराव कांबळे -कोल्हापुर गोवा बनावटीचे मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात विकणाऱ्या एकावर भुदरगड पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये संशयित तानाजी दत्तू पाटील याला ताब्यात घेत, त्याच्याकडून ३ लाख ९७ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

             मौजे मेघोली (ता. भुदरगड) येथे राहणारा ४१ वर्षीय तानाजी दत्तू पाटील हा आजरा - नवले - मेघोली या दुर्गम भागातील रस्त्याने गोवा बनावटीचे  मद्य तस्करी करतो अशी माहिती भुदरगड पोलिसांना मिळाली होती. यानुसार सापळा रचून बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये संशयित तानाजी दत्तू पाटील याला चार चाकी टेम्पो सहित थांबवून तपासणी केली असता त्याच्याकडे ६० बॉक्स गोवा बनावटीचे विदेशी मद्य मिळून आले. त्याच्याकडून १ लाख ४७ हजार ६०० रूपयेचे विदेशी मद्य, तसेच चारचाकी टेम्पो असा एकूण ३ लाख ९७ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संशयित तानाजी दत्तू पाटील याच्यावर भुदरगड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर, पोलीस नाईक संदेश कांबळे, किरण पाटील आदींचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment