कोदे गावाला चक्री वादळाचा तडाखा, 30 घरांचे नुकसान... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, May 8, 2021

कोदे गावाला चक्री वादळाचा तडाखा, 30 घरांचे नुकसान...

 कोदे गावाला चक्री वादळाचा तडाखा, 30 घरांचे नुकसान...

भिमराव कांबळे - कोल्हापूरगगबावडा तालुक्यातील कोदे गावाला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून सुमारे 30 कुटुंबाच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. काल झालेल्या वाऱ्यामुळे घराचे छत , सिमेंटचे पत्रे मंगलोरी कौले शंभर ते दीडशे फुटावर जाऊन कोसळले.अचानक घडलेल्या प्रकाराने लोकांची तारांबळ उडाली.

    येथील  30 कुटुंबाचे  सुमारे सात आठ लाखाचे नुकसान झाले आहे. तहसीलदार संगमेश कोडे यांनी तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले असून तलाठी रोहिणी पवार व मंडळ अधिकारी विनायक लुगडे यांनी प्राथमिक पंचनामे केले आहेत.दरम्यान शासनाने नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment