Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

म्हसळ्यात जानसई नदीत बुडून ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू : अजब प्रकार म्हसळा पोलीसांत घटनेची नोंद नाही.

 म्हसळ्यात जानसई नदीत बुडून ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू : अजब प्रकार म्हसळा पोलीसांत घटनेची नोंद नाही.

अरुण जंगम-म्हसळा 



म्हसळा शहरानजीकच असणाऱ्या जानसई नदीपात्रात रमेश बाबाजी पवार वय ६५ रा. सुरई या  वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.रमेश दिं.२८ मे रोजी आपल्या नात लगांकडे गेला होता तो घरी आला नाही, शनी.दि.२९ मे रोजी सकाळी ११ चे दरम्यान जानसई नदी पात्रात एका मृत व्यक्तीची बॉडी तरंगत असताना परीसरां तील नागरिकाना दिसली,खात्रीअंती मृत इसम हा सुरई येथील रमेश पवारआसल्याचे नक्की केल्यावर बघता -बोलता रमेशचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शहरांत तालुक्यात व अन्यत्र व्हायरल सुध्दा झाला, निष्पाप व गायक रमेशचा दुदैर्वी अंत झाल्या बद्दल सर्वत्र हळहळ व शोक व्यक्त होऊ लागला.

म्हसळा पोलिसांचा अजब कारभार घटनेची नोंदच केली नाही.

म्हसळा नजीकचअसणाऱ्या सुरई गावातील रमेश बाबाजी पवार वय ६५ याचा जानसई नदीत बुडून मृत्यू नदीपात्रात  झाला. या घटने बाबत रमेश पवार हा मानसीक रुग्ण आहे,त्याच्या मृत्यू बाबत आमचा कोणावर ही संशय नाही सबब गुन्हा नोंदवू नये असे म्हसळा पोलीसात नातेवाईकांनी लेखी दिल्यामुळे पोलिसांनी  घटनेची नोंद केली नसल्याचे सपोनी उध्दव सुर्वे यानी सांगितले .पोलीस अशा प्रकरणांच्या प्राथमिक चौकशीत कोणते पुरावे समोर येतात,याबाबत सर्व बाजू पडताळून पाहतात. तपास करून जबाब घेतात. पुरावा असल्यास त्या आधारा वर पोलीस अपघात( अक्सिडेंटल) आहे, आत्महत्या (सुसायड) की घातपात (होमी सायडल) प्रकारचा गुन्हा दाखल करू शकतात.

"भविष्यात पंतप्रधान विमा योजना,शेतकरी अपघात विमा योजना अथवा अन्यसरकारी योजनांसाठी पुरावा म्हणून  व्यक्तीच्या निधना नंतर विम्याच्या दाव्या साठी किंवा सरकारी, खासगी कार्यालयीन कामांसाठी मृत्यू प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.त्यामुळे पोलीसानी पो.स्टेशन मध्ये घटनेची नोंद व पी.एम्. करणे आवश्यक होते.गुन्हा नोंदविण्यास नकार देणाऱ्या नातलगांची पोलीस अधिकाऱ्याने समज करणे कर्तव्य होते".
महादेव पाटील, माजी सभापती पं.स. म्हसळा

"पोलीस एखाद्या दखलपात्र प्रकरणाची माहिती जरी मिळाली तरी त्या आधारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्वतःहून करू शकतात, या घटनेतअकस्मात मृत्यू अशी नोंद केली जाते. साधारणपणे अनै सर्गिक मृत्यूप्रकरणी अशा प्रकारची नोंद केली जाते. ही नोंद म्हणजेच हे प्रकरण पोलिसांकडे आलं आहे,असं मानलं जातं. भविष्यात दंड प्रक्रिया कलम 174 अंतर्गत पोलीस या प्रकरणाचा तपास करतात. "
कायदे विषय सल्लागार,

सध्याच्या काळात कोणताच पोलीस अधिकारी गुन्हा दाखल न करण्याचा धोका पत्करत नाही.एखादा गुन्हा घडला आणि तो झाकण्यासाठी पोलिसांनीच बेकायदेशीर कृत्य केल्याची काही उदाहरणे 25-30 वर्षांपूर्वी होती. पण अलीकडच्या 20-25 वर्षांत असे प्रकार घडताना दिसत नाही. संबंधित प्रकरण इतरांकडे गेल्यास चुकीचे करणाऱ्या अधिकाऱ्यालाच त्याचं उत्तर वरीष्ठाना द्यावं लागतं"

सुर्यकांत बनसोडे, निवृत्त पोलीस अधिकारी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies