पुण्यात वर्क फ्रॉम होमचे तीन तेरा मनसेचे राज्य सहचिटणीस
कृष्णा मोहिते आक्रमक
किशोर उकरंडे-पुणे
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विशेषतः पुणे शहरात आज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या महारोगाने मृत्यू चे तांडव करून थैमान घातले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ब्रेक_द_चेन_अंतर्गत असणाऱ्या आवाहनांचे व नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असताना अनेक खाजगी कंपन्या आणि काही हॉटेल चालक नियमबाह्य वर्तन करताना आढळतात.
सरकारी अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, आरोग्य खात्यातील कर्मचारी स्वताच्या जीवाची पर्वा न करता सुरक्षिततेसाठी, लोकांना या रोगापासून वाचविन्यासाठी, रोगाची लागण झालेल्यांना उपचार देण्यासाठी जीवाचे रान करत आहेत अशा वेळी आपणही आपली जबाबदारी पाळली पाहिजे.
परंतु मागील आठवड्यात विमाननगर मधील गिगास्पेस या आयटी पार्क मधील Tech Mahindra या कंपनीचे आयडिया वोडाफोन कॉल सेंटर मात्र मुख्यमंत्र्यांच्या सर्व सूचना व आदेश धाब्यावर बसवत, कमी जागा आणि पूर्ण 100% कामगार बोलावून खचून गर्दित बसवून काम करून घेत आहेत असे भितिदायक वातावरण या कंपनी मध्ये आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचार्यांची तक्रार आली की कंपनीचा व्यवस्थापक श्री रुपेश पांडा जो की परप्रांतिय असून स्वतः कोलकाता वरून घरून काम करतोय आणि इतर कामगारांचा जीव धोक्यात घालून सक्तीने कामावर येण्यासाठी बोलतो अन्यथा कामावरून काढून टाकू अशी धमकी कामगारांना देतोय. हे मी त्वरीत कामगार नेते व प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांना कळवले असता त्यांनी त्वरित पुणे
मनसेचे राज्य सहचिटणीस
कृष्णा मोहिते जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कामगारआयुक्त व विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यास सांगितले.
मनसेचे राज्य सहचिटणीस कृष्णा मोहिते यांनी तातडीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गृह विभागाचे तहसीलदार गायकवाड व विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना निवेदन देऊन तातडीने कंपनी वर कारवाई करून कंपनी शासन नियमानुसार चालू ठेवावी व बाकी कामगारांना (work from home) घरून काम करण्याची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कंपनी विरोधात मोठे आंदोलन उभे करेल तसेच मनसे कामगार सेना कंपनीला कामगारांच्या जीवाशी कदापि खेळू देणार नाही असा इशारा दिला.