मुलाला जीवदान देण्यासाठी बापाला जलसमाधी :वसगडे येथील घटना . - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, May 7, 2021

मुलाला जीवदान देण्यासाठी बापाला जलसमाधी :वसगडे येथील घटना .

  मुलाला जीवदान देण्यासाठी बापाला जलसमाधी :वसगडे येथील घटना .

उमेश पाटील - सांगलीवसगडे ता.पलूस. येथील सहदेव बाळकृष्ण सुतार वय. ४० याचा मुलाला वाचविताना शेततळ्यात बुडुन मृत्यु झाला.वसगडे - भिलवडी स्टेशन - येळावी या जुना मार्गावरील गँस एजन्सी परीसरात रावसाहेब पाटील यांच्या शेततळ्यात दुपारी साडे तीन च्या दरम्यान ही घटना घडली.

घटना ठिकाणा वरून मिळालेली माहीती वरून सहदेव बाळकृष्ण सुतार हा आपला मित्र किरण चव्हाण याच्या सह मुलगा प्रेम उर्फ प्रतिक सुतार ( वय १०  ) याला पाेहण्यासाठी शिकविण्यास .वसगडे - भिलवडी स्टेशन - येळावी या जुना मार्गावरील गँस एजन्सी परीसरात शेततळ्यात गेले होते . यावेळी प्रेम उर्फ प्रतिक हा पहील्यांदाच पोहण्यास गेला होता . त्याच्या पाठीला कॉन बांधलेला होता . त्याला त्याचे वडील सहदेव सुतार यांचे मित्र किरण चव्हाण पोहण्यास शिकवित होते .प्रेम पहिल्यांदा पाण्यात उतरला असता तो घाबरला त्याने किरण चव्हाण याला मिठी मारली

त्यामुळे किरण चव्हाण यांने त्याला कसे बसे काठावर आनले . किरण व प्रेम हे दोघे जन पाण्यात दमलेल्या आवस्थेत होते . प्रेम उर्फ प्रतिक ला त्याचे वडील सहदेव काठावर हात देत आसता त्यांचा पाय घसरला व ते पाण्यात कोसळले . प्रेमला किरण चव्हाण हा काठावर घेऊन येऊ पर्यत वडील सहदेव तळ्यात क्षणांतच बुडाले सहदेव यांना पोहायाला येत नसल्याने त्यांचा मृत्यु झाला .आशी माहीती घटना ठिकाणच्या ग्रामस्थांतुन मिळली .

सहदेव चा प्रेम उर्फ प्रतिक हा एकुलता एक मुला हाेता . मुलाला जिवदान देण्यासाठी बापाला जलसमाधी मिळाल्याने  गावातुन हळहळ व्यक्त हाेत आहे. घटनेचा पाेलीसांनी पंचनामा केला. आधिक तपास भिलवडी पोलिस करीत आहेत .

No comments:

Post a Comment