Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

तौत्के वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवावा

 तौत्के वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवावा 

मदतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई 

प्रतीक मिसाळ- सातारा



सातारा कोकण किनार पट्टीवर आलेल्या तौत्के या चक्रीवादळाचा फटका पाटण तालुक्यालाही बसला आहे . त्या वादळासह मुसळधार पावासामुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले . त्यांना तातडीची मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासना मार्फत पाठवून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे , गृह ( ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले . चक्री वादळामुळे व पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आज गृह राज्यमंत्री यांनी पाटण तालुक्यातील शिरेवाडी , मंद्रळकोळे , चिबेवाडी , केरळ आदि नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली व त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते .



 यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे , तहसिलदार योगेश टोमपे , गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुखे , पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माझी , उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अजित पाटील , विद्याधर शिंदे उपस्थित होते . सातारा जिल्ह्याला नुकताच चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा फटका बसला . याचा परिणाम पाटण तालुक्यात विशेषत : डोंगरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे . वादळी वारे व मुसळधार पावासाने घरांचे पत्रे उडाले , घरांच्या भिंती पडल्या जनतेचे मोठे नुकसान या वादळामुळे झाले आहे . या पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे पाईप वाहुन गेले आहेत . जवळजवळ 300 पेक्षा जास्त विजेचे खांब वाकुन पडले , काही पूर्ण निखळुन पडले . त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठ खंडीत झाला आहे .वाकलेले विजेचे खांब तातडीने सरळ करुन विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या . उद्या दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या . ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत . त्यांना तातडीची मदत देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे करावा व त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies