काँग्रेसचेओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी 15 रोजी चिपळुणात - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, June 14, 2021

काँग्रेसचेओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी 15 रोजी चिपळुणात

 काँग्रेसचेओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी 15 रोजी चिपळुणात

ओंकार रेळेकर-चिपळूणमहाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी मंगळवार दिनांक १५ जून रोजी चिपळूण दौऱ्यावर येत असून यावेळी ते चिपळूणातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

ओबीसी विभागाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यामध्ये मंगळवार दिनांक १५ रोजी दुपारी १२ वाजता कापसाळ येथील शासकीय विश्रामगृह चिपळूण काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी  यावेळी काँग्रेस पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे


No comments:

Post a Comment