खंडाळा घाटात अज्ञात युवतीचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला
प्रतीक मिसाळ- सातारा
खंडाळा तालुक्यातील खंडाळा घाट सुरवातीला रस्त्यालगत असलेल्या ड्रेनेज पाईप मध्ये अर्धवट जळालेले युवतीचे मृतदेह सापडले असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचे प्राथमिक अंदाज आहे या बाबत अधिक माहिती अशी की खंडाळा तालुक्यातील खंडाळा घाटाचा प्रारंभी रस्त्यालगत पाईप मध्ये अंदाजे 22 ते 24 वर्षाचा युवतीचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले आहे याची खबर मिळताच खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे सातारा जिल्हा अतिरीक्त पोलीस अधीक्षक श्री धीराज पाटील यांनी घटना समजताच घटना स्थळी भेट दिली असून तपासकामी पोलिसांना सूचना व मार्गदर्शन केले प्रथमदर्शी सदर ची घटना ही खून करून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने केल्याचे वाटत असून या बाबत अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केला असून खंडाळा पोलीस चौकशीसाठी पुढील कारवाई करत आहे .