कर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, June 24, 2021

कर्जत वन विभागातील वनरक्षकाला 4000 रुपयांची रंगेहात लाच घेताना अटक

वनरक्षक बनला भक्षक

लाच स्वीकारताना रंगेहात पकडला,ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

कर्जत वनविभागातील कर्मचारी

महाराष्ट्र मिरर टीमतक्रारदार यांचे पत्नीच्या नावे, भिसेगाव ता. कर्जत येथील सिटी सर्वे नं. 443 ही येणे मिळकत आहे, तक्रारदार यांना सदरची मिळकत विकसित करवायची आहे. परंतु मिळकतीवर काही झाडें आहेत. तक्रारदार यांना सदर जागेवरची झाडे तोडवायची असल्याने तक्रारदार यांनी वनविभाग कर्जत येथे परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता, त्या अनुषंगाने लोकसेवक हे तक्रारदार यांना भेटून परवानगी न घेता तुम्ही झाडें जर तोडली, तर तुमच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, सदरची कारवाई न करण्यासाठी व परवानगी चे काम करून देण्यासाठी लोकसेवक  यांनी पंचासमक्ष  .४,०००/- रु लाच स्वीकारले असता त्यांना  रंगेहाथ पकडण्यात आले आहे...   

 अंगद विठ्ठल नागरगोजे  वय 33 वर्ष असं  लाच स्वीकारणाऱ्या वन कर्मचाऱ्याचे नावं आहे.                                    

श्रीमती सुषमा पाटील ,  पोलीस निरीक्षक , एसीबी ठाणे यांनी सापळा रचून ही यशस्वी कामगिरी केली आहे.


No comments:

Post a Comment