वटपौर्णिमा :महाराष्ट्र वृक्षदिन
दिनविशेष
दिलीप प्रभाकर गडकरी
वृक्षांनी आच्छादलेली जमीन पावसाचे जास्तीतजास्त पाणी शोषते .जर असे आच्छादन नसेल तर साठ टक्के पावसाचे पाणी वाया जाते आणी भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जाते .कसदार जमिनीची धूप होते .वृक्ष नसतील तर जमिनीचा वरचा सुपीक भाग दोन वर्षात २.५ से .मी .इतका धुवून जाऊ शकतो .पण हाच थर तयार करण्यासाठी निसर्गाला शेकडो वर्षे लागतात .
एक मोठा वृक्ष तासाला ७१२ किलो प्राणवायू बाहेर टाकतो तर २२५२ किलो कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेतो .हा शोषून घेतलेला वायू सुमारे ८० हजार घरांतून बाहेर पडणाऱ्या कार्बनडाय ऑऑक्साइड वायू इतका असतो .एक वडाचे झाड दररोज सुमारे दोन टन पाणी बाहेर टाकतेच ; परंतु वर्षात ५.५ लाख रुपये मूल्यांचे प्रदूषण विरोधी कार्य करते .एक झाड अर्थव्यवस्थे साठी साधारणपणे बत्तीस लाख रुपयाची भर घालते .
वृक्षांची महती माहीत असल्यामुळेच भारतीय संस्क्रुतिने माणसाला नतमस्तक होण्यास शिकवले आहे ."वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे "असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे .
ज्येष्ठ पौर्णिमा -वटपौर्णिमा म्हणून अनेक वर्षापासून साजरी करून त्यादिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने हा दिवस "महाराष्ट्र वृक्षदिन " म्हणून २००३ पासून साजरा करण्याचे ठरवले आहे .त्यादिवशी स्त्रीयांनी वडाची पूजा जरूर करावी परंतु त्याचबरोबर पतीराजासह कमीत कमी एक झाड लावावे व वर्षभर ते जगवावे .हया वर्षी म्हणजे २०२१ साली दिनांक २४ जून रोजी "वट पौर्णिमा "आहे .प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून हा दिवस साजरा करावा .