मुद्रेतील 48 नागरिकांचे स्थलांतर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

मुद्रेतील 48 नागरिकांचे स्थलांतर

 अतिवृष्टीची शक्यता ?

मुद्रेतील 48 नागरिकांचे स्थलांतर

आदित्य दळवी
महाराष्ट्र मिरर टीम

रायगड जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता प्रशासन अलर्ट झालं असून कर्जत तालुक्यातील कर्जत नगरपालिका हद्दीतील मुद्रे येथील आठ कुटुंबातील 48 नागरिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यात आले असून यावेळी प्रांताधिकारी वैशाली परदेशी ,नायब तहसीलदार सुधाकर राठोड,मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील,पोलीस निरीक्षक अरुण  भोर,माजी नगरसेवक संतोष पाटील आदी यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यात एकूण 314 कुटुंबातील 1139 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं असून महाड तालुक्यातील सर्वाधिक 164 कुटुंबातील 525 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.No comments:

Post a Comment