शहिद दशरथ पाटील अनंतात विलीन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

शहिद दशरथ पाटील अनंतात विलीन

 शहिद दशरथ पाटील अनंतात विलीन  

  •   वडगावमध्ये पार्थिवावर शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार, 
  • शोकाकुल वातावरणात साश्रुनयनांनी अखेरचा निरोप   

            सुधीर पाटील सांगली                                  

  वडगाव येथील भारतीय सैन्य दलातील शहिद हेड कॉन्स्टेबल दशरथ पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पार्थिवावर पुष्पचक्र वाहुन विविध अधिकारी व पदाधिकारी मान्यवरांनी आदरांजली वाहिली. तर नागरिकांनी अमर रहे... भारत माता की जय... घोषणा देत अंत दर्शन घेऊन साश्रुनयनांनी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप दिला.                                                दशरथ पाटील हे भारतीय सैन्यदलाच्या २६ मराठा युनिटमधुन जम्मूमध्ये अखनुर सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना सोमवारी सकाळी ते शहिद झाले होते. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी आठच्या सुमारास वडगाव गावी आणण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी कुटुंबानी व नातेवाईकांनी तर सभामंडपात शोकाकुल वातावरणात नागरिकांनी अंत दर्शन घेतले. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.        


          

    गावात फुलांनी सजवलेल्या वाहनामधुन अमर रहे... अमर रहे.. भारत माता की जय... घोषणा देत शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच माळरानावर मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत शहिद दशरथ पाटील यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे बंधू तुकाराम पाटील यांनी भडाग्नी दिला.                               

     याप्रसंगी भारतीय सैन्यदल, सांगली जिल्हा सैनिक बोर्ड, पोलीस प्रशासन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी पुष्पचक्र वाहुन श्रद्धांजली वाहिली.

No comments:

Post a Comment