जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79 मि.मी. पावसाची झाली नोंद - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79 मि.मी. पावसाची झाली नोंद

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79 मि.मी. पावसाची झाली नोंद

ज्ञानेश्वर बागडे
महाराष्ट्र मिरर टीम रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 79.38 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 223.56  मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. 

     आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

      अलिबाग-80.00 मि.मी., पेण- 80.00 मि.मी., मुरुड-69.00 मि.मी., पनवेल-160.40 मि.मी., उरण-111.00 मि.मी., कर्जत- 79.50 मि.मी., खालापूर- 69.00 मि.मी., माणगाव- 39.00 मि.मी., रोहा-97.00 मि.मी., सुधागड-84.00 मि.मी., तळा-67.00 मि.मी., महाड-36.00 मि.मी., पोलादपूर-35.00 मि.मी, म्हसळा- 54.00 मि.मी., श्रीवर्धन- 87.00 मि.मी., माथेरान- 122.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 270.10 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 58.99 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 7.11 टक्के इतकी आहे.


No comments:

Post a Comment