नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कर्जत मध्ये मानवी साखळी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कर्जत मध्ये मानवी साखळी

 नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कर्जत मध्ये मानवी साखळी

  नरेश कोळंबे-कर्जत         कर्जत , ठाणे, मुरबाड, नवी मुंबई, उरण चे भूमिपुत्र शेतकरी यांनी एकत्र येत नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करण्यासाठी आज दिनांक 10 रोजी विविध ठिकाणी मानवी साखळी आंदोलन केले. त्याच प्रमाणे आज हे आंदोलन कर्जत मधील नेरळ हुतात्मा चौक येथून सुरू होऊन   हुतात्मा स्मारक मानिवली गावी स्थगित करण्यात आले.

       नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र मागील ८ वर्षांपासून आग्रही आहेत. ह्याच धर्तीवर सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या. आता कामाला सुरुवात होत असताना त्या विमानतळाला माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे असे निवेदन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने भूमिपुत्र शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची भावना सगळीकडे व्यक्त होत आहे . याच साठी गुरुवार दी १० रोजी कर्जत मधील नेरळ येथील हुतात्मा स्मारक ते मानीवली येथील हुतात्मा स्मारक असे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय समितीचे पदाधिकारी आणि अनेक आगरी तसेच इतर समाजातील लोक एकत्र आले होते . यामध्ये भाजप कर्जत अध्यक्ष मंगेश म्हस्कर, भाजप सरचिटणीस राजेश भगत, कर्जत नगरसेवक घुमरे, आगरी समाज अध्यक्ष सावळाराम जाधव, प्रा.विजय कोंडीलकर,उपाध्यक्ष केशव मूने , शिवराम महाराज तुपे, मनीषा दळवी,संतोष ऐनकर, महेश कोळंबे,संतोष जामघरे, असे अनेक कार्यकर्ते व भूमिपुत्र यावेळेस एकत्र होते. 

 नवी मुंबईतील विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आम्ही आग्रही असून यासाठी आज आम्ही हुतात्मा चौक नेरळ ते हुतात्मा स्मारक मानिवली अशी मानवी साखळी बनवणार आहोत.   दि. बा. पाटील यांनी सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची जाण ठेवत आम्ही एकत्र आलो आहोत,  दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी फक्त आम्ही आगरी एकत्र आले असे नसून अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी तसेच जाती धर्माचे लोक एकत्र आलो आहोत. कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमची मागणी पूर्ण करणार आहोत आणि विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव द्यायला लावणार आहोत यासाठी काहीही करावे लागले तरी ही आमची तयारी आहे. 


---- सावळाराम जाधव ( आगरी समाज अध्यक्ष, कर्जत

No comments:

Post a Comment