Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

केंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षाचा चिमूरडा दरीत कोसळून गंभीर

 केंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षाचा चिमूरडा दरीत कोसळून गंभीर

प्रतीक मिसाळ- वाई 



 केंजळगडावर ( ता वाई ) चढाई करत असताना दहा वर्षाचा मुलगा खोल खड्यात कोसळून गंभीर जखमी झाला . त्यास पाखेरी वस्तीतील युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे.त्याला वाई येथील प्राथमिक उपचारानंतर पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे . केंजळगडावर पर्वतारोहण करण्यासाठी सासवड ( ता.पुरंदर ) परिसरातील रहिवासी असलेले सात ते आठ पर्यटक आले होते . यामध्ये मयांक उरणे हा आपल्या वडीलांसोबत आला होता . केजळगडावर आज सकाळी सात वाजता पर्वतारोहण यासाठी सुरुवात केली . सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान पुढे जात असताना या ग्रुप मधील मयंक उरणे ( वय १० ) हा दोनशे फूट खोल कोसळून गंभीर जखमी झाला.थंड हवा पावसाची रिप रिप वाढलेले गवत यामुळे किल्ल्याच्या पाऊल वाटेवर चिपचीप झाली आहे.यामुळे मयांक चा पाय घसरून तो दोनशे फूट दरीत कोसळून खोल दरीत झाडाला धडकून झुडपात अडकला होता . त्याचा शोध करुनही तो सापडत नसल्याने आसरे ते रायरेश्वर रस्त्यावर असणाऱ्या पाखिरे वस्ती वर संबंधित पर्यटकांनी येऊन माहिती दिली . तेथील गंगाराम सपकाळ , सागर पाकीरे , सुरेश पाकीरे , रामदास पाकीरे , सचिन पाकीरे , नवनाथ पाकीरे , विलास पाकीरे , विजय पाकीरे असे सर्वजण ग्रामस्थांना सोबत घेऊन मयंक उरणे याचा शोध घेण्यास गेले असता त्यांनी खोल दरीतून त्याला गंभीर जखमी अवस्थेत शोधुन बाहेर काढला.वाई येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारा नंतर पुढील उपचारासाठी पुणे दाखल केला आहे.ही माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय मोतेकर पोलीस नाईक व आपले सहकारी शिवाजी वायदंडे सुभाष धुळे प्रशांत शिंदे अमित गोळे गोळे संजय देशमुख संतोष शेलार आदींनी घटनास्थळी धाव घेतली . पाखिरे वस्तीतील युवकांनी मुलाचा शोध घेऊन बाहेर काढल्याबद्दल व मदत कार्य केल्या बद्दल वाई तालुक्यातील नागरीकांनी वरील वस्तीतील ग्रामस्थांचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies