धक्कादायक;बलात्काराचा प्रयत्न फसल्यानंतर चालू रेल्वेतून अल्पवयीन मुलीस दिले फेकून,आरोपी सैन्य दलातील जवान - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

धक्कादायक;बलात्काराचा प्रयत्न फसल्यानंतर चालू रेल्वेतून अल्पवयीन मुलीस दिले फेकून,आरोपी सैन्य दलातील जवान

 धक्कादायक;बलात्काराचा प्रयत्न फसल्यानंतर चालू रेल्वेतून अल्पवयीन मुलीस दिले फेकून,आरोपी सैन्य दलातील जवान

प्रतीक मिसाळ सातारा



सातारा - लोणंद मार्गावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना
अवघ्या 10 तासात रेल्वे ब्लॉक करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

सातारा गोवा- निजामुद्दीन ही रेल्वेगाडी गोव्यावरून सुटल्यानंतर रात्री दीड वाजता सातारा येथे तेथून पुढे लोणंदला पोहचण्यास अर्धा तास लागतो . या वेळेत एका सैन्य दलातील फौजीने आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसल्याने तिला धावत्या ट्रेनमधून फेकून दिल्याची घटना घडली . सातारा जिल्ह्यातील सातारा- लोणंद या दरम्यान आदर्की फाटा येथे ट्रेन आल्यानंतर आरोपीने मुलीला बाहेर फेकून दिले . परंतु ट्रेन ब्लाक करत अवघ्या 10 तासांत सैन्य दलातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत .

पोलिसांनी दिलेली सविस्तर माहीती अशी ,

 गोवा निजामुद्दीन ही रेल्वेगाडीतील एस 7 हा डबा आहे , त्याच्यामध्ये 25,26,27,28 मध्ये एक कुटुंब दिल्लीला जाण्यासाठी प्रवास करत होते . त्या कुटुंबातील कर्ता पुरूष मिलिट्रीतून रिटायर झाल्याने ते दिल्लीला निघाले होते . रात्री जेवण झाल्यानंतर मुलगी बेडवर झोपलेली होती , तेव्हा आरोपीने त्या मुलीला बाथरूमध्ये झोपेतच उचलून  नेले . तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता मुलीला जाग आली . त्या मुलीला जाग आल्यानंतर ती मोठयाने रडू लागली आणि लाथा मारू लागली . तेव्हा आरोपीने तू रडू नको तुझ्या आईकडे घेऊन जातो  असे सांगून मुलीला दरवाजा उघडून बाहेर फेकून दिले . सुदैवाने आदर्की फाटा झाल्यानंतर घाट रस्ता असल्याने असल्याने रेल्वचे स्पीड 20 चे होते . मुलीला बाहेर फेकले असले , तरी तिला कमी प्रमाणात दुखापत झाली आहे . तेथील स्थानिकांना मुलगी गावातील किंवा परिसरातील असे वाटले . नंतर तिला हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी आणले असताना तिने घडलेली खरी हकीकत सांगितली .

ट्रेन ब्लॉक करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

 पोलिसांना ही बातमी समजताच महाराष्ट्र राज्य लोहमार्गच्या अप्पर महासंचालक प्रज्ञा सरोदे यांनी माहिती दिली . तेव्हा त्यांनी ट्रेन ब्लॉक करायची सूचना दिली . ट्रेन ब्लॉक केल्यानंतर एकाही प्रवाशाला खाली उतरू दिले नाही . लोणंद जळगाव या दरम्यान 300 ते 400 कॉन्सटेबल आणि मित्र प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बसविले . रेल्वेतील कोणलाही खाली उतरू दिले नाही . यावेळी जवळपास 20 ते 30 लोकांची ओळखपरेड केली . त्यातून मुलीने लगेच आरोपीला ओळखले . तेव्हा त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे . आरोपी मिलिट्रीतील असून झांशीच्या युनिटमध्ये कार्यरत आहे .पिडित मुलगी 8 वर्षाची अल्पवयीन आहे . तिच्या हनुवटीला खरचटले असून पायाला फॅक्चर आहे . तसेच तिला अजून काही उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेणे गरजेचे असल्याने तिला तेथे नेले जाणार असल्याची माहीती लोहमार्ग अधीक्षक पुणे सदानंद वायसे पाटील यांनी दिली .

No comments:

Post a Comment