कराडला ढगफुटी सह मुसळधार पावसाने झोडपले
कुलदीप मोहिते -कराड
काल मंगळवार सकाळपासूनच वातावरण ढगाळ असल्यामुळे कराड व आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड उखाडा निर्माण झाला होता दुपारी तीनच्या सुमारास अवकाळी पावसाने कराड व आजूबाजूच्या परिसराला अक्षरशा झोडपून काढले कराड मधील सर्व रस्ते जलमय झाले लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसले तर काहींच्या दुकानांमध्ये पाणी शिरले अनेक ठिकाणी झाडे ही पडली जवळ जवळ एक तास हा मुसळधार पाऊस कराडमध्ये पडत होता पावसाचा जोर इतका होता की मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये पाणी शिरले हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली