खटाव तालुक्यात विविध ग्रामपंचायतींनी सुरु केलेल्या कोरोना केंअर सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, June 12, 2021

खटाव तालुक्यात विविध ग्रामपंचायतींनी सुरु केलेल्या कोरोना केंअर सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

 खटाव तालुक्यात विविध ग्रामपंचायतींनी सुरु केलेल्या   कोरोना केंअर सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

मिलिंदा पवार -खटाव  खटाव तालुक्यातील वाढत असलेल्या कोरोना रुग्णांना गावातच उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने व ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने खटाव तालुक्यात विविध गावांमध्ये सुरु कलेल्या विविध कोरोना केअर सेंटरला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी  भेटी देवून व्यवस्थेची पहाणी केली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी  नुकतेच म्हासुर्ने, चितळी, कलेढोण, सातेवाडी, भुरकवाडी, नीढळ याबरोबर कलेढोण येथील रुग्णालयाला भेटी दिली. या भेटी प्रसंगी प्रांताधिकारी जनार्धन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गट विकास अधिकारी रमेश काळे, तालुका आरोग्य अधिकारी युनिस शेख आदी उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोरोना केंटर सेंटरमध्ये   कोणत्या सुविधा देत आहात ह्याची माहिती घेऊन 15 व्या वित्त आयोगाच्या निधी मधील किती निधी ग्राम पंचायतीला आला आहे त्यातील किती निधी विविध रुग्णांसाठी वापरला. त्यामधून काय सुविधा दिल्या याची विचारणा केली.    आशा स्वयंसेविका आणि शिक्षक यांचे कामाचा आढावा घेतला. तसेच बाधित रुग्ण व रुग्णाच्या संपर्कात आलेले नागरिक  याबाबत माहिती घेतली.  तसेच    ग्राम दक्षता समिती यांनी योग्य ती काळजी घेऊन गाव सुरक्षित राहील याबाबत खरबदारी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पहाणी दरम्यान केल्या.

No comments:

Post a Comment