सज्जनगड परिसरात बिबट्याची दहशत; हल्ल्यात बोकड ठार कारी गावातील घटना
प्रतीक मिसाळ सातारा
साताऱ्या पासून जवळच असलेल्या सज्जनगड पायथ्यालगतील राईघर कारी या ठिकाणी बिबट्याचा हल्ल्यात एक बोकड ठार झाल्याची घटना समोर आली आहे या बाबत अधिक माहिती अशी की साताऱ्याचा पश्चिम भागात असलेल्या सज्जनगड पायथ्या लागत असलेल्या खोऱ्यातील राईघर कारी या ठिकाणी काल दि 11 जून रोजी सायंकाळी पाच चा सुमारास महेश नारायण कदम यांच्या शेळ्या येथील ओढ्या पलीकडील म्हळवी या शिवारात चरत होत्या . या ठिकाणच्या पश्चिमेकडील असलेल्या घनदाट जंगला मधून अचानक एका बिबट्याने या शेळ्यांवर हल्ला चढविला आणि या हल्ल्यात एक बोकड ठार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे या बाबत वनविभागास काळविल्यानंतर आज वनविभागाने गावात येऊन घटनेचा पंचनामा केला असून उस्मानाबादी जातीचे साधारण 18000 ₹ किमतीचे बोकड या घटनेत ठार झाले असून वन अधिकारी श्री राज मोसालागी यांनी पंचनामा केला आहे या परिसरात वारंवार होणारे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागने उपाय योजना कराव्यात आणि या घटनेत ठार झालेल्या बोकडाचा रु 18000 मोबदला मालकास मिळावा अशी मागणी गावकर्यांमधून होत आहे .