विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची साळाव व चौल नाका तपासणी नाका येथे केली अँटीजन तपासणी - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची साळाव व चौल नाका तपासणी नाका येथे केली अँटीजन तपासणी

 विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची साळाव  व चौल नाका तपासणी नाका येथे केली  अँटीजन तपासणी

अमूलकुमार जैन-अलिबाग
रायगड जिल्ह्यात  कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव हाताबाहेर जात असतानाही नागरिक मात्र गांभीर्याने वागत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या आदेशानुसार

 विनाकारण फिरणाऱ्यांची रेवदंडा पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या चौल व  साळाव तपासणी नाका येथे अँटीजन कोव्हिड तपासणी सुरू करण्यात आली आहे.  तपासणी केल्यानंतर  ज्या नागरिकांचा तपासणी अहवाल हा कोरोना बाधित येइल अशा रुग्णांना मुरुड किवा अलिबाग जिल्हा रुग्णालयात  मध्ये  दाखल करण्यात येणार आहे. आज साळाव तपासणी नाका येथे   एकोणपन्नास नागरिकांची  तपसणी करण्यात  करण्यात आली असून यामध्ये सुदैवाने कोणीही कोरोना बाधित असल्याचे आढळून आले नाही.चौल नाका येथे 56 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये सात नागरिक हे कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत.

सदर तपासणी वेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी भेट दिली.त्यावेळी त्यांच्यासमवेत रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात होते.

औषध किंवा डॉक्टर यांच्याकडे जात असल्याचे कारण सांगत  गैरफायदा घेऊन काहीजण दिवसभर विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्गही झपाट्याने वाढत असून, रायगड जिल्ह्यातील परिस्थिती आता गंभीर झाली आहे. तरुण तसेच व महिलांचा मृत्यू झाल्याचे खळबळजनक वास्तव शहरात समोर आले आहे. मात्र, त्यानंतरही विनाकारण फिरणाऱ्यांना काहीही सोयरसुतक नसल्याचे रेवदंडा पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी सांगितले. कोव्हिड टेस्ट सुरू केल्याने विनाकारण फिरणारे तरूण धास्तावले आहेत.

साळाव तपासणी नाका येथे ही मोहीम यशस्वी करण्याकरिता- 

रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद चिमदा, वाहतूक शाखेचे पोलीस नाईक केदार साखरकर,  तर चौल नाका येथे सहाय्यक फौजदार म्हात्रे,वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संतोष गायकवाड, महिला पोलीस नाईक शेळके,पोलीस शिपाई कदम, आदींनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment