Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

समर्थमुळे साताऱ्याचा झेंडा सातासमुद्रापार आ . शिवेंद्रसिंहराजे ; योगा स्पर्धेत उल्लेखनीय यश

  समर्थमुळे साताऱ्याचा झेंडा सातासमुद्रापार आ . शिवेंद्रसिंहराजे ; योगा स्पर्धेत उल्लेखनीय यश 

प्रतीक मिसाळ- सातारा

आपला सातारा प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे . शिक्षणाबरोबरच विविध क्रीडाप्रकारात साताऱ्यातील असंख्य खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत . नुकत्याच झालेल्या ऑनलाईन जागतिक योगा स्पर्धेत साताऱ्यातील समर्थ सुशांत सपकाळ या १२ वर्षाच्या मुलाने उल्लेखनीय कामगिरी करून दुसरा क्रमांक पटकावला असून समर्थमुळे साताऱ्याचा झेंडा अटकेपार फडकला आहे , असे गौरवोद्गार आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले . दिल्ली येथील ४० प्लस हेल्दी लाईफस्टाईल या संस्थेमार्फत जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून जागतिक स्तरावरील इंटरनॅशनल योगा चॅम्पियनशिप या स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते . तीन वयोगटात झालेल्या या स्पर्धेत १० ते १८ वयोगटात जगभरातून ५०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते . या वयोगटात साताऱ्यातील १२ वर्षाच्या समर्थ सपकाळ याने द्वितीय क्रमांक पटकावला . याबद्दल त्याचे आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले . यावेळी समर्थचे पालक आणि सातारा पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते . समर्थने मिळवलेले यश कौतुकास्पद असून यापुढेही तो चमकदार कामगिरी करेल आणि साताऱ्यासह आपल्या देशाचे नाव जगभरात उज्वल करेल , अशा शुभेच्छा आ . शिवेंद्रसिंहराजे आणि श्रीमंत छ . सौ . वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी दिल्या .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies