Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अत्यावस्थ कोरोनाग्रस्त भिकू घडशी यांनी तब्बल दीड महिन्यांनी केली कोरोनावर मात

 अत्यावस्थ कोरोनाग्रस्त भिकू घडशी यांनी तब्बल दीड महिन्यांनी केली कोरोनावर मात 

अमोल चांदोरकर - श्रीवर्धनम्हसळा घोणसेवाडी येथील भिकू घडशी वय वर्षे 52 यांना कोरोनाची लागण झाली होती .ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे प्राथमिक उपचार चालू असताना त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना 5 मे 2021 रोजी उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे कोविड कक्षात दाखल करण्यात आले होते .घडशी यांना ऍडमिट केले त्यावेळी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी 40% पर्यंत खाली आली होती .न्यूमेनियाची देखील लागण झाली होती .अशा अत्यावस्थ स्थितीत रुग्णालयातील डॉक्टरांना त्यांना वाचवणे एक आवाहन होते .घडशी यांची भक्कम मानसिकतमुळे आणि डॉक्टर वर्गासह स्टाफ नर्सेस कर्मचारी वर्ग यांच्या मेहनतीला यश आले आणि तब्बल दीड महिन्यांनी अत्यावस्थ स्थितीत आलेले घडशी आज दिनांक 19 जून रोजी कोरोनाला हरवून स्वतः पायी  चालत  सर्व डॉक्टरवर्ग स्टाफ कर्मचारी वर्गाचे आभार मनात स्वघरी रवाना झाले .डिस्चार्ज घेऊन निघताना भावना व्यक्त करताना घडशी व त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले होते .घडशी यांना निरोप देण्यासाठी रुग्णालयातील सर्वजण प्रवेशद्वारा पर्यंत आले होते .या वेळी घडशी पती पत्नी खूप भावुक झाले होते श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात खूप चांगली रुग्णसेवा केली जाते तसेच सगळे डॉक्टर्स नर्सेस कर्मचारी वर्ग खूप चांगली सेवा देतात औषोधोपचार देखील वेळच्यावेळेस केले जातात सर्व जण आपुलकीने वागणूक देतात सर्वांचे उपकार मानावे तेव्हढे कमीच आहेत .डॉक्टरांच्या रूपात साक्षात देवाचे दर्शन झाल्याची भावना घडशी यांनी या वेळी व्यक्त केल्या .माझ्या पतीला येथील डॉक्टरांमुळेच पुनर्जन्म मिळाल्याची भावना घडशी यांच्या पत्नीने व्यक्त केली .उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे .वैद्यकीय अधिकारी नोडल ऑफिसर डॉ एम जी भरणे .वैद्यकीय अधिकारी डॉ .अली ,डॉ ,मयूर .डॉ ,ऐमान ,डॉ चित्रा डॉ दीक्षा सिंग डॉ दीक्षा कुमारी डॉ सिमरण मित्तल डॉ अभिजित, डॉ बतुल ,डॉ मारकड ,डॉ निशा सर्व अधिपरिचारिका ब्रदर्स एक्स रे टेक्निशियन ,लॅब टेक्निशियन व कर्मचारी वर्ग एक दिलाने अहोरात्र मेहनत घेत आहेत .उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथील सेवा पाहून जिल्ह्यातील इतर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचारासाठी कल वाढत आहे ,श्रीवर्धन वाशियांसाठी ही अभिमानाची बाब असल्याने तालुक्यातून या रुग्णालयातील सर्वांचे वेळोवेळी आभार मानले जात आहेत .

आजाराची लक्षणे जाणवत असल्यास आजार अंगावर न काढता नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचार करावेत अँटीजेन टेस्ट करून घ्यावी टेस्ट निगेटिव्ह  आल्यास काहीही त्रास जरी जाणवत नसला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत .आणि अँटीजेन टेस्ट पॉसिटीव्ह आल्यास ऍडमिट व्हावे ,प्राथमिक स्थितीत ऍडमिट झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो .वेळ गेल्यास शरीरात अनेक अडचणी निर्माण होऊन रुग्ण चांगला होण्यास विलंब लागतो किंवा मृत्यू ओढवतो .कोरोनातून रुग्ण नक्कीच बरा होतो मात्र सर्वानी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी ,शासनाने कोरोना विषयक नियम घालून दिलेत ते सर्वानी पाळावे

डॉ .एम जी भरणे -वैद्यकीय अधिकारी नोडल ऑफिसर 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies