मायक्रो फायनान्स कंपन्यांची सावकारी वसुली थांबवा अन्यथा तिव्र आंदोलन: प्राजक्ता जाधव - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

मायक्रो फायनान्स कंपन्यांची सावकारी वसुली थांबवा अन्यथा तिव्र आंदोलन: प्राजक्ता जाधव

मायक्रो फायनान्स कंपन्यांची सावकारी वसुली थांबवा अन्यथा तिव्र आंदोलन: प्राजक्ता जाधव

उमेश पाटील -सांगली



मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारा त्रास थांबावा यासाठी आमदार अरुण लाड  आणि जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पलुस तालुक्यातील युवतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणेत आले.

या निवेदनात म्हटले आहे की, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून लॉकडाऊन काळात चालू असलेल्या वसुलीसाठी कर्जदार महिलांवरती मुद्दलीचे हप्ते व व्याज परताव्यासाठी दबाव आणला जात आहे. परंतू सध्या कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीत महिलांना रोजगार नाही, व्यवसाय नाही या पार्श्वभूमीवर दोन वेळच्या अन्नाची ही भ्रांत असताना हप्ते कसे भरायचे हा प्रश्न महिलांना पडला आहे‌. तरी शासनाने हा विषय गांभीर्याने विचारात घेऊन तुर्तास कर्ज हप्ते मुदत वाढ द्यावी व व्याज माफ करावे. 

यावेळी पलुस तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा नंदाताई पाटील, युवती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा प्राजक्ता जाधव, पलूस तालुका सरचिटणीस पुजा पवार, युवती राष्ट्रवादी काँग्रेस कुंडल शहर अध्यक्षा वैष्णवी जंगम, मयुरी नलवडे, सुनंदा पाटील व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment