दिघी- माणगाव मार्गावर सतत होणारे अपघात रोखण्यासाठी स्ट्रीपलचा पर्याय - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

दिघी- माणगाव मार्गावर सतत होणारे अपघात रोखण्यासाठी स्ट्रीपलचा पर्याय

 दिघी- माणगाव मार्गावर सतत होणारे अपघात रोखण्यासाठी स्ट्रीपलचा पर्याय

दिघी सागरी पोलीसांचे प्रयत्न

 अमोल चांदोरकर - श्रीवर्धन

दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हसळा दिघी मार्गावरील गोंडघर गावाच्या हद्दीमध्ये मागील 4 महिन्यामध्ये अपघात होत असून यामध्ये 5 व्यक्तींना जीव गमवावा लागला होता तर अनेक जखमी झाले आहेत, अपघात रोखण्यासाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमाण यांच्या प्रयत्नाने अपघात रोखण्यासाठी गोंडघर ते दिघी मार्गावर महत्वाच्या ठिकाणी स्ट्रीपलर बसविण्यात आले असून यामुळे अपघात रोखण्यासाठी मदत होणार असल्याने नागरिकांनी पोलीस ठाणेला धन्यवाद देत आहेत. 

   दिघी पोर्ट चा होत असलेला विकास व तेथील वाहतुकीसाठी दिघी-पुणे या मार्गाचे नूतनीकरण होत असून माणगाव ते दिघी या मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. सिमेंट काँक्रीट चा तयार होत असलेला मार्गावरून सध्या भरधाव वेगाने वाहने धावत असल्याने अपघातांचे प्रमाण देखील हळूहळू वाढत चालले आहे अशातच दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले असून यामध्ये मोटार सायकलच्या अपघातामध्ये 5 जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. तर गाड्यांच्या धडकेने मुक्या जनावरांचा देखील मृत्यू झाले आहेत. रस्त्याचे काम अजून पूर्ण झाले नसल्याने दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमाण तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सुर्वे, पोलीस नाईक संदीप चव्हाण यांच्या प्रयत्नाने रस्त्याचे काम करणारे जे एम म्हात्रे इन्फ्रा पोजेकट्च्या माध्यमातून गोंडघर ते दिघी पर्यंत ज्या ठिकाणी रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे अशा ठिकाणी व महत्वाच्या भागात म्हणजे गाव, शाळा , चौक व इतर ठिकाणी स्ट्रीपलर बसविण्याचे काम युध्द पातळीवर हाती घेण्यात आले आहे यामुळे पुढे होत असलेल्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी मदत होणार आहे. पोलिसांच्या या कार्यतत्परतेमुळे नागरिकांनी आभार मानले आहेत

No comments:

Post a Comment