भाजपच्या धडक आंदोलनास मोठे यश - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, June 20, 2021

भाजपच्या धडक आंदोलनास मोठे यश

 भाजपच्या धडक आंदोलनास मोठे यश  

किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार

महाराष्ट्र मिरर टीम -खालापुरखालापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना  पीक कर्ज मिळाले नाही किवा सोसायटी चे अधिकारी अजय भारती टाळाटाळ करतात शेकाप कार्यकर्त्यानाच प्राधान्य देतात अश्या अनेक तक्रारी आल्याने भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे सुनील गोगटे पीडित शेतकऱ्यांना घेऊन खालापूर सोसायटी ऑफिसमध्ये दाखल झाले तेथे अजय भारती यांना जाब विचारला असता त्यांनी काही अडचणी मुळे काही शेतकऱ्यांना लाभ अजून मिळाला नाही आणि काही रक्कम किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून मिळेल असे सांगितले. अनेक बाबीवर चर्चा झाली आता पेरण्या सुरू झाल्या बी  बियाणे आणि अवजारे खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून त्वरित कर्जाची संपूर्ण रक्कम अदा करावी अशी मागणी केली . नंतर त्यांनी 21 जून पर्यत सर्वांना रक्कम मिळेल असे आश्वासन दिले  होते । जर मुदतीत पैसे दिले नाहीत तर 21 तारखेला पुन्हा येऊ असा इशारा गोगटे यांनी दिला होता. त्याचाच धसका घेऊन  आज दिनांक 20 जून रोजी रविवार असून सुद्धा सोसायटीचे अधिकारी अजय भारती यांनी फोन करून शेतकऱ्यांना बोलावून त्यांना चेक दिला होता. त्यामुळे शेतकरी खुश झाले।ते आज सुनिल गोगटे आणि त्यांचे भारतीय जनता पक्षाचे सहकारी यांचे आभार मानत आहेत.

No comments:

Post a Comment