कोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत म्हणून सेवा बजावणाऱ्या डॉ.समीर दळवी यांचा झाला सन्मान - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, June 20, 2021

कोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत म्हणून सेवा बजावणाऱ्या डॉ.समीर दळवी यांचा झाला सन्मान

कोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत म्हणून सेवा बजावणाऱ्या डॉ.समीर दळवी यांचा झाला सन्मान

डॉ .दळवी खरे कोविड योध्दा : डॉ.कांचन मदार ओंकार रेळेकर-चिपळूण

कोरोना संकट काळात डॉक्टर समीर दळवी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना धिर देण्याचे महान कार्य करीत आहेत,स्वतःच्या आरोग्याची फार  काळजी न घेता दळवी सतत रुग्णाच्या सेवेत हजर आहेत,डॉ.दळवी रुग्णांसाठी खरे कोविड योध्दा असल्याची प्रतिक्रिया वुमेन्स सपोर्ट वुमेन्स फाउंडेशनच्या प्रेसिडेंट डॉ.कांचन मदार यांनी व्यक्त केली.

         कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे,अशा काळात तत्परतेने सेवा बजावत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाईफ केअर हॉस्पिटलचे तज्ञ डॉ.समीर दळवी अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावत आहेत,या काळात  दरवर्षी प्रमाणे नियमित येणाऱ्या आजरपणावर  उपचार घेण्या करीता येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची हसत खेळत आपुलकीने विचारणा करून   रुग्णांमधील मानसिक तणाव कमी करून कोरोना रोगाची भिती काढण्याचे महान कार्य डॉ .दळवी करीत  आहेत,करोना महामारी सारख्या संकटात आपुलकीची योग्य सेवा देऊन लोकांना महामारी च्या संकटातुन बाहेर काढण्याचे काम करत एक आदर्श निर्माण केल्या मुळे शनिवारी वुमेन्स सपोर्ट वुमेन फाउंडेशन च्या वतीने डॉ. दळवी यांचा कोविड योद्धा म्हणून विशेष सत्कार करण्यात आला केला. या वेळी बोलतांना यांनी डॉ. कांचन मदार यांनी त्यांच्या चांगल्या सेवे बद्दल कौतुक करून  शुभेच्छा दिल्या,चिपळुण मधील प्रसिद्ध लाईक केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. समीर दळवी यांना 'वुमेन्स सपोर्ट वुमेन' या संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. डॉ. दळवी हे संसर्ग कालावधीत गेली दीड

वर्षे लाईफ केअर रुग्णालयाच्या माध्यमातून संसर्ग बाधितांवर उपचार करीत आहेत. स्वत:सह रुग्णालयातील अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लाईफ केअरमध्ये संसर्ग बाधित  असणाऱ्यांना करीता  स्वतंत्र

यंत्रणा कार्यरत आहे. अनेक रुग्णांना त्यांच्या या सेवेमुळे दिलासा मिळाला आहे. पहिल्या लाटेत डॉ.दळवी स्वत: बाधित झाले होते. त्यातूनही बरे झाल्यावर वैद्यकीय अनुभवाच्या आधारे बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केले. या सर्व कामाची दखल घेत  फाउंडेशन च्या वतीने लाईफ केअर हॉस्पिटलचे संपूर्ण कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले . चिपळूण मधील सिद्धिविनायक हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ.विशाल पुजारी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला तसेच डॉ.यतीन जाधव,चिपळूण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जोती यादव यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी डॉ .ईसहाक खतीब, डॉ .समीर दळवी डॉ. शमीना परकार, डॉ. हुझेफा खान, डॉ .शाहिद परदेशी, डॉ. नदीम खतीब, डॉ. वसीम खतीब, डॉ .विष्णू माधव  डॉ. आयशा खान ,संदेश पवार  

वुमेन्स सपोर्ट वुमेन्स फौंडेशनच्या प्रेसिडेंट डॉ .कांचन मदार, डॉ.शामिना परकार, सदस्या सुप्रिया गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.विविध ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या  महिला,पत्रकार यांचाही या फाउंडेशन च्या वतीने सन्मान केला जातो.


No comments:

Post a Comment