नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत बेंडकाळ येथे शेतीशाळा संपन्न. - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, June 28, 2021

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत बेंडकाळ येथे शेतीशाळा संपन्न.

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत बेंडकाळ येथे शेतीशाळा संपन्न.

राम जळकोटे-उस्मानाबाद नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे दि.28 जुन 2021 रोजी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी बीज उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया करणे, बीबीएफ ने पेरणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासन अंतर्गत कृषी विभागाच्या बीज प्रक्रियेच्या स्पर्धे मध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले.यावेळी प्रशिक्षक कु.स्नेहल उमा विरेंद्र पाटील, कृषीसहायक शैलेश जटटे, शेतीशाळा प्रशिक्षक स्नेहल पाटील, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment