भिम छावा संघटनेच्या वतीने ताडीवाला रोड भागातील विद्युत प्रवाह करणाऱ्या वाहिन्या भूमिगत व अंडरग्राउंड करण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, June 30, 2021

भिम छावा संघटनेच्या वतीने ताडीवाला रोड भागातील विद्युत प्रवाह करणाऱ्या वाहिन्या भूमिगत व अंडरग्राउंड करण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन

 भिम छावा संघटनेच्या वतीने ताडीवाला रोड भागातील विद्युत प्रवाह करणाऱ्या वाहिन्या भूमिगत व अंडरग्राउंड करण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन

गजानन गायकवाड- पुणेताडीवाला रोड भाग अत्यंत दाट लोकवस्ती असणारा गोरगरीब मजूर धुणीभांडी करणारा वर्ग राहत आहे परंतु या भागात महावितरणाच्या विद्युत प्रवाह करणाऱ्या वाहिन्या हे अत्यंत अस्तव्यस्त उघड्यावर लाटक आल्या आहेत प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुर्घटना होत असते यामध्ये 17/6/2021 रोजी मनीषा साळवे या महिलेचा महावितरणाच्या चुकीमुळे विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्या अनेक वेळा या भागातील समस्यांची तक्रार महावितरणकडे नोंदवले परंतु कोणतीच ठोस उपाययोजना होत नसल्याने आज भिम छावा संघटनेचे अध्यक्ष शामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्व महावितरण कार्यालय रास्ता पेठ येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले मुख्य अभियंता सचिन तालेवार पुणे परिमंडळ, पुणे 

यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते युवा नेते धनंजय कांबळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे सुजित यादव, काँग्रेस पक्षाचे युवा नेते मेहबूब नदाफ, भिम छावा संघटनेचे शहराध्यक्ष अमित मोरे, यल्लाप्पा गायकवाड, मानवाधिकार हक्क चे दशरथ शेट्टी,  सिद्धेश्वर मंडळाचे अनिल घटवळ, सामाजिक कार्यकर्ते अमित मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे गौतम कांबळे, सिद्धार्थ मैत्री संघाचे चंद्रकांत गायकवाड, निलेश बनसोडे,भिम छावा संघटनेचे निलमताई गायकवाड दिपाली गायकवाड प्रतिक्षाताई गायकवाड आदि महिला व  विशाल कांबळे  अनिकेत पालखे सचिन माळगे, प्रमोद धावारे,संघभुषण साखरे, प्रशांत गायकवाड, सुमित गायकवाड, प्रशांत कांबळे, प्रशांत गाडे, अक्षय धेंडे, आंदोलनाचे संयोजन संघटनेचे उपाध्यक्ष निलेश गायकवाड, राजगृह सोशल फाऊंडेशनचे कवी प्रभू सुनगर यांनी केले होते

No comments:

Post a Comment