Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार-खा.सुनिल तटकरे

 पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार-खा.सुनिल तटकरे

कुणाल माळवदे-बोर्लीपंचतन



खासदारांचा स्थानीक विकास कार्यक्रम अंतर्गत सर्वे येथे सात लाखांचे समाजघराचे उद्घाटन जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले. यावेळी तटकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी इमारतीचे देखील भूमिपूजन करण्यात आले. अंगणवाडीसाठी नऊ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदकडून मंजूर करण्यात आला आहे.  

यावेळी ते बोलताना तटकरे म्हणाले की, येत्या काळात पर्यटनच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करायची आहे. जीवना बंदर सारखी जेट्टी ही आदगाव बंदरावर देखील मंजूर झाली आहे. येत्या काळात रेवस - अलिबाग- मुरुड - श्रीवर्धन सागरी मार्ग देखील विकासाच्या कामात हातभार लावणार आहे. वेळास आदगाव रास्ता ह खचलेला आहे. या कामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ते देखील काम लवकर सुरू होईल. बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अंगणवाडिचे काम पूर्ण झाल्यावर मी स्वतः, पालकमंत्री आदीतीताई व विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे आम्ही तिघेही उदघाटनच्या कार्यक्रमला उपस्थित राहणार असल्याची ग्वाही यावेळी तटकरेंनी बोलताना दिली. उदघाटनला येऊ तेव्हा गावातील टेकडीवरच्या मंदिराच्या कामचे भूमिपूजन करू असेही तटकरे यांनी उपस्थितांना संबोधताना सांगितले. अंगणवाडी नजीक असलेल्या नाल्याला संरक्षक भिंत बांधण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही बांधकाम खात्याला दिल्या. प्रास्तविक शंकर अंबेकर यांनी केलं. तर आभार मोतीराम परबळकर यांनी केलं.  


यावेळी कार्यक्रम दरम्यान श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष महमद भाई मेमन, उपाध्यक्ष सचिन किर, मंदार तोडणकर सर्वे ग्रामपंचायत सरपंच गुलजार हुसेन, उपसरपंच धनंजय चव्हाण,रुषीकेश गोळे,  विनोद ढवुळ,माने मॅडम ,रुतुजा भोसले मॅडम, वडवली सरपंच प्रियंका नाक्ती, महिला मंडळ अध्यक्षा वैशाली चव्हाण व गावातील  महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies